AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Iran War : युद्धाचा भडका… पर्यटकांच्या मनात धास्ती, महाराष्ट्रात 99 टक्के बुकिंग रद्द; पर्यटन व्यवसायाचा बोऱ्या वाजला

इस्रायल-इराण युद्धाने गंभीर स्वरूप घेतल्याने जगभरातील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायावर झाला असून, 99 टक्के बुकिंग रद्द झाली आहेत. दुबईसह आखाती देशांत अनेक भारतीय नागरिक अडकले असून, त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे पर्यटन उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे.

Israel-Iran War : युद्धाचा भडका... पर्यटकांच्या मनात धास्ती, महाराष्ट्रात 99 टक्के बुकिंग रद्द; पर्यटन व्यवसायाचा बोऱ्या वाजला
महाराष्ट्रात 99 टक्के बुकिंग रद्द
| Updated on: Mar 02, 2026 | 1:21 PM
Share

इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेनेही इराणवर हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई मारले गेले आहेत. त्यामुळे इराणचा संतापाचा पारा भडकला असून इराणने अमेरिकेच्या तळांवर हल्ला चढवला आहे. एकूण सहा देशात अमेरिकेच्या लष्कराची तळे आहेत. या ठिकाणांना इराणने लक्ष्य केलं आहे. दुबईतील अमेरिकेच्या तळावर हल्ला चढवताना दुबईतील इतर भागांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी आखाती देशातील उड्डाणे थांबविली आहेत. त्यामुळे त्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. एकट्या महाराष्ट्रातच 99 टक्के बुकिंग रद्द झाल्याने पर्यटन व्यवसायाचा पुरता बोऱ्या वाजला आहे.

पर्यटकांकडून बुकिंग रद्द

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम हा विविध स्तरावर होताना पाहायला मिळत आहे, भारतातील भांडवली बाजारावर जसा याचा परिणाम झाला. तसा पर्यटन व्यवसाय यांच्यावर ही परिणाम दिसत आहे. परदेशात फिरायला जाणाऱ्या ९० %लोकांनी बुकिंग रद्द केले आहेत जगभरात सुरु असलेल्या घटनांमुळे पर्यटन व्यवसायावरही मोठा परिणाम झाल्याची माहिती राजा राणी ट्रॅव्हल्सचे डायरेक्टर विश्वजीत पाटील यांनी दिली.

शेकडो फ्लाईट्स रद्द

इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे आजही असंख्य फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. काल रविवारी संध्याकाळपर्यंत देशातील 100 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. यातील 62 फ्लाइट्स येणारे होते आणि 42 फ्लाइट्स जाणारे होते. प्रवाशांना फ्लाइट्स रद्द करण्यात आल्याचे मेसेजही पाठवण्यात आले होते. मात्र, फ्लाइट्स रद्द झाल्याने शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला.

आम्ही सर्व सेफ

अमेरिका, इस्त्रायल विरुद्ध इराण मध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत दुबईतील भारतीय नागरिकाने वस्तुस्थिती सांगितली आहे. सध्य दुबईतील स्थिती सर्वसामान्य असून कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही. दुबईमध्ये जॉबसाठी गेलेल्या भारतीयांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. मात्र आम्ही सगळे सेफ आहोत, असं दुबईत राहणारे तानाजी गोरड यांनी सांगितलं.

नाशिकचे 200 भाविक अडकले

मक्कासाठी गेलेले नाशिकचे सुमारे 200 भाविक अडकले आहेत. जिद्दा विमानतळ बंद असल्याने अनेक जण अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. वेगवेगळ्या ट्रॅव्हल कंपनीकडून गेलेले यात्रेकरु अडकले आहेत. नाशिकचे फारुक तांबोळी यांच्याकडून देखील गेलेले 35 जण मक्का मध्ये अडकून पडल्याचा दावा केला आहे. विमानतळ सुरू होत नाहीत तोपर्यंत काहीही सांगणे शक्य नसल्याचे तांबोळी यांचे म्हणणे आहे. मात्र सर्व यात्रेकरु सुरक्षित आहेत.

जळगावचे 31 जण अडकले

अमेरिका इराण युद्धात होणाऱ्या हल्ल्यामुळे दुबईत जळगाव जिल्ह्यातील 31 नागरिक अडकले आहेत. विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील 31 जण गेले होते. पण युद्धामुळे हे सर्वजण दुबईत अडकून पडले आहेत. हल्ल्यामुळे दुबई येथून विमानसेवा बंद झाल्यामुळे सर्व जण अडकले आहेत. मात्र, हे सर्वजण हॉटेलात सुखरुप असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसापासून सततच्या होत असलेल्या हल्ल्यामुळे दुबईतील पर्यटन स्थळ तसेच सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली आहे. दुबईचं प्रशासन तसेच हॉटेल प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात असून हॉटेलमध्ये थांबण्याचं सांगण्यात आल्याची माहिती दुबईत अडकून पडलेले जळगावातील दुर्गेश चौधरी यांनी दिली आहे.

जागृती जाधव दुबईत अडकली

यवतमाळ जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या रवी जाधव यांची कन्या जागृती जाधव दुबईत अडकली आहे. जागृती जाधव ही एमबीबीएससाठी दुबईला गेली होती. 1 मार्च रोजी ती भारतात येणार होती. मात्र, ऐनवेळी फ्लाईट रद्द झाल्याने ती दुबईत अडकली असून सध्या ती सुरक्षित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.

माजी नगरसेविकेसह 40 ज्येष्ठ नागरिक अडकले

पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेविका सुमन नेटकेंसह 40 ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप दुबईत अडकलाय. सांगवीतील गायकवाड कुटुंबियातील 6 सदस्यांचा यात समावेश आहे. दुबईत अचानकपणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानं हा ग्रुप भारतात परतू शकला नाहीये. 25 फेब्रुवारीला पर्यटनासाठी गेलेला हा ग्रुप आज भारतात परतणार होता. मात्र दुबईतून विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आलीये. त्यामुळं हा ग्रुप विमानांची उड्डाणे सुरु होईपर्यंत दुबईत अडकून राहणार आहेत. सध्या ते सुरक्षित स्थळी असले तरी दुबईवरील वाढते हल्ले पाहता, या सर्वांचे नातेवाईक चिंतेत आहेत. भारत सरकारने विशेष विमानांची सोय करुन अडकलेल्या भारतीयांची लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी नातेवाईक करतायेत.

उमरग्यातील जोडपं अडकलं…

पर्यटनासाठी दुबईत गेलेले उमरगा येथील दोन जोडपे युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडलं आहे. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि शिवानंद माशाळकर हे आपल्या पत्नीसह पर्यटनासाठी दुबईला गेले असताना तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकून पडले आहेत. दुबईमध्ये सध्या निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वाहतूक आणि संपर्क व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. यामुळे यांना परतीचा प्रवास करता आलेला नाही. या गंभीर परिस्थितीची माहिती शिवानंद दळगडे स्वतः व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्या कुटुंबीयांना दिली आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या सुरक्षिततेबाबत काळजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दोन्हीही जोडपे सुरक्षित असल्याची माहिती आहे.

लातूरचे तरुण दुबईत अडकले

पर्यटनासाठी गेलेले लातूर जिल्ह्यातले अनेकजण दुबईत अडकले आहेत. तर न्यू दुबई भागात असलेल्या वसतिगृहात लातूर, धाराशिव, नाशिक, पुणे येथील 25 ते 30 विद्यार्थी अडकलेले आहेत. दुबईत रोबोटिक इंजिनिअरिंगसाठी गेलेली लातूरची विद्यार्थिनी नेहा मिसार हिने आम्ही सर्व सुरक्षित असल्याचं कळवलं आहे. मात्र युद्धाच्या परिस्थितीमुळे सर्वजण घाबरलेले आहेत, असं तिने सांगितले आहे. नेहा मिसार यांनी त्याच्या वसतिगृह जवळ असलेल्या परिस्थितीचे दोन व्हिडिओ पाठवले आहेत.

तर पर्यटनासाठी गेलेले, राहुल कदम – लातूर, शुभम पवार – रेणापूर, सचिन पाटील – वलांडी, मनोज कोरे – निलंगा, स्वप्नील पानकुरे – किल्लारी, मच्छिंद्र सुडके – खुंटेगाव अशी दुबईत पर्यटनासाठी गेलेले नागरिकांची नावे आहेत.

Follow Us
गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल...
Girish Mahajan | गिरीश महाजनांची बदनामी करणारा अखेर अटकेत! बनावट फोटो व्हायरल प्रकरणात मोठा खुलासा
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये
ठाकरे गटाला जबर धक्का! आंदोलन सुरु असतानाच जिल्हाप्रमुखांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुकांच्या लढ्याला..
Rajool Patil | वडिलांच्या प्रश्नावर राजुल पाटील गप्प! पण सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा
शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत
Uddhav Thackeray | शिवाजी पार्कवर ठाकरेंची सभा संपली, पण आंदोलक हटले नाहीत; पोलिसांची धावपळ वाढली!
वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप, म्हणाले...
Uddhav Thackeray | वांगचुकांशी संवाद टाळणाऱ्या सरकारवर उद्धव ठाकरेंचा संताप; पाकिस्तानचा दाखला देत घेरलं!
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
ठाकरेंचे किती आमदार संपर्कात? फुटीर खासदाराने दिली मोठी माहिती
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया...
खासदार सुप्रिया सुळे अचानक पुढे गेल्या अन् भाजप नेत्याच्या पाया का पडल्या? त्या व्हिडीओने रोखल्या नजरा
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी... ठकारेंची सरकारवर टीका
जो देश भारतात दहशतवादी पाठवतो, त्याच्याशी...वांगचूक यांच्या आंदोनाला पाठिंबा देताना ठाकरेंची केंद्रावर सडकून टीका!
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल;
वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार...
हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश
Dombivli Hospital Case | हायकोर्टाचा मोठा झटका! रमेश म्हात्रेंना 5 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश; पोलिसांचा ॲक्शन मोड!
FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं.

FIFA World Cup 2026: स्पेन चॅम्पियन, अतिरिक्त वेळेत अर्जेंटीनाला 1-0 ने नमवलं

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली.

IND vs ENG: रोहित शर्माचं शतक व्यर्थ, इंग्लंडने शेवटचा सामना आणि मालिकाही जिंकली

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख.

IND vs ENG: भारताने सामना नेमका कुठे गमावला? कर्णधार शुबमन गिलने त्या तीन षटकांचा केला उल्लेख

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर….

दिल्लीच्या जंतर-मंतरवर रात्रीचे निदर्शक जमू लागले, चादर आणि बिछानासोबत घेऊन लोक हजर…

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक.

IND vs ENG: शेवटच्या सामन्याच्या वावड्या आणि रोहित शर्माने केली बोलती बंद, ठोकलं दणदणीत शतक

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video.

डेहराडुन येथे ‘धुरंधर’ गायिकेला चुकीचा स्पर्श, चाहत्यांच्या गर्दीत… Video