AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाझामध्ये इस्रायल आता काय करणार? हल्ले थांबेना, ट्रम्प यांचे शांततेसाठीचे प्रयत्न निष्फळ?

इस्रायली सैन्य आता गाझामध्ये काय करणार आहे? ट्रम्प शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. नेमकं काय झालं आहे, याविषयी जाणून घेऊया.

गाझामध्ये इस्रायल आता काय करणार? हल्ले थांबेना, ट्रम्प यांचे शांततेसाठीचे प्रयत्न निष्फळ?
gazaImage Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Edited By: | Updated on: May 20, 2025 | 3:21 PM
Share

शनिवारी रात्री आणि रविवारी गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 103 जण ठार झाले. नासेर हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील खान युनूस शहर आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या हल्ल्यांमध्ये 48 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यातील काही जण विस्थापितांच्या घरांवर आणि तंबूंवर झाले आहेत. मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे गाझामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहेत. कारण एकीकडे गाझामधील इस्रायली हल्ले थांबवावेत यासाठी ट्रम्प सातत्याने आग्रही आहेत, पण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू त्यांचे ऐकत नाहीत. गाझामध्ये आपले ऑपरेशन वाढविण्यासाठी ते सातत्याने कटिबद्ध आहेत.

इस्रायलच्या लष्कराने गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणावर नवी लष्करी कारवाई सुरू करण्याची घोषणा रविवारी केली. 20 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशात इस्रायलने हल्ला चढविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हे वक्तव्य करण्यात आले आहे. हमासला त्याच्या अटींवर नवा शस्त्रसंधी करार मान्य करण्यासाठी दबाव आणण्याचा इस्रायलचा हा ताजा प्रयत्न आहे.

इस्रायली लष्कराने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात लष्कराने डझनभर लढाऊंना ठार केले आणि 670 हून अधिक लक्ष्यांना लक्ष्य केले. गाझामधील आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, नवीन हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, शनिवारी रात्री आणि रविवारी गाझामध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 103 जण ठार झाले. नासेर हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणेकडील खान युनूस शहर आणि आजूबाजूच्या परिसरात झालेल्या हल्ल्यांमध्ये 48 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यातील काही जण विस्थापितांच्या घरांवर आणि तंबूंवर झाले आहेत. मृतांमध्ये निम्म्याहून अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या आपत्कालीन सेवेनुसार, उत्तर गाझामधील जबलिया निर्वासित छावणीतील एका घरावर झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील नऊ जण ठार झाले.

नागरी सुरक्षा सेवेने दिलेल्या माहितीनुसार, जबलिया शहरात एका कुटुंबाच्या घरावर झालेल्या हल्ल्यात सात मुले आणि एका महिलेसह 10 जण ठार झाले. इस्रायलने गाझामध्ये आपली कारवाई तीव्र केल्यानंतर 17 मे च्या रात्री झालेल्या या हल्ल्यांवर इस्रायली लष्कराकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. इस्रायलने म्हटले आहे की, गाझाच्या दक्षिणेकडील लाखो पॅलेस्टिनींना विस्थापित करण्याची आणि मदत पुरवठ्यावर अधिक नियंत्रण ठेवण्याची त्यांची योजना आहे.

भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.