रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर, मंत्री नितेश राणे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल मोठा दावा

नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी अत्यंत मोठा दावा केला, ज्याने एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. आता त्यावरच मोठे विधान मंंत्री नितेश राणे यांनी केले.

रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर, मंत्री नितेश राणे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबद्दल मोठा दावा
Nitesh Rane
| Updated on: Oct 03, 2025 | 1:02 PM

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. मात्र, यावेळी माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात एकच खळबळ उडाली. रामदास कदम यांनी दिवंगत नेते तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी दावे केले आहेत. बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीत का ठेवला? याचा तपास करावा असे थेट म्हटले. हे विधान जबाबदारीने करत आहे, मी हे फार मोठं विधान करतो आहे, असेही त्यांनी म्हणत याची चाैकशी एकनाथ शिंदे यांना करा म्हटले. रामदास कदम यांचे बोलणे अनेकांना मोठा धक्का बसला.

रामदास कदम यांनी केलेल्या या विधानावर आता मंत्री नितेश राणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, रामदास कदम यांचा बाण बरोबर सुटलाय. याचे उत्तर दिले पाहिजे की, स्वित्झर्लंडच्या विमानातून कोण येणार होते, कोण वाट पाहत होते, कोणत्या कागदपत्रासाठी वाट पाहिली गेली, कोणत्या संपत्तीसाठी? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले पाहिजे. रामदास कदम जे बोलत आहेत ते बरोबर आहे.

पुढे नितेश राणे म्हणाले की, उद्वव ठाकरे, आदित्य ठाकरे मातोश्रीकडून उत्तर मागितले पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पहिला मोर्चा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर काढावा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बांधावर काही दिलं ना चांदावर काही दिले नाही. झालेल्या प्रत्येक नुकसानीची भरपाई आम्ही सरकार म्हणून नक्कीच करू असेही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नितेश राणे यांनी म्हटले.

रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक विधानानंतर आता नितेश राणे यांनीही मोठा दावा केला असून स्वित्झर्लंडच्या विमानाची वाट पाहिली जात असल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच रामदास कदम बरोबर बोलत असल्याचेही त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच दिशा सालियान प्रकरणात नितेश राणे यांनी अत्यंत गंभीर आरोप ही आदित्य ठाकरे यांच्यावर केली होती.