बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, मंत्र्याचं घर पेटवलं
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे बांगलादेशचे परराष्ट्र राज्य मंत्री हुमायू कोबिर यांच्या घराला अज्ञातांकडून आग लावण्यात आली आहे. ही घटना बांगलादेशच्या सिलहट परिसरात घडली आहे.

बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे बांगलादेशचे परराष्ट्र राज्य मंत्री हुमायू कोबिर यांच्या घराला अज्ञातांकडून आग लावण्यात आली आहे. ही घटना बांगलादेशच्या सिलहट परिसरात घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या आगीमध्ये फार काही नुकासन झालेलं नाही, परंतु घराच्या सुरक्षा भितींच्या आतून आगीच्या ज्वाला उठत असल्याचं पहायला मिळालं. यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मंत्री हुमायू कोबिर यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. परंतु सिलहट पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. हुमायू कोबीर यांच्या घराला अज्ञात व्यक्तींनी आग लावली, मात्र त्यांच्या घरावर कोणत्याही प्रकारचा पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. तसेच या हल्ल्यामध्ये या घराचं फार नुकसान देखील झालं नसल्याचा दावा देखील पोलिसांकडून करण्यात आला आहे.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ संदर्भात असा दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ बांगलादेशचे परराष्ट्र राज्यमंत्री हुमायू कोबिर याच्या घराचा आहे. काही लोकांनी त्यांच्या घराला आग लावली आहे. तर अनेकांकडून असा देखील दावा केला जात आहे की, हुमायू कोबिर यांच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. हुमायू कोबिर यांच्या घरावर कुठल्याही प्रकारचा पेट्रोल बॉम्बने हल्ला झाला नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यांच्या घराला कोणीतरी आग लावली हे जरी सत्य असलं तरी देखील या घटनेत त्यांचं फार मोठं नुकसान झालं नसल्याचंही यावेळी पोलिसांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ जरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असला तरी देखील या व्हिडीओची अद्यापपर्यंत कोणतीही पुष्ठी झालेली नाही.
तपास सुरू
दरम्यान पोलिसांकडून पेट्रोल बॉम्बने हल्ला झाल्याचं वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे. मात्र हा हल्ला नेमका कोणी केला? याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. अज्ञातांकडून घराला आग लावण्यात आली आहे. ही आग नेमकी कोणी लावली? कशी लावली? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत.