
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. या दोन्ही देशांत कोणत्याही क्षणी युद्ध होऊ शकते, असे म्हटले जात आहे. हीच बाब लक्षात घेता भारतात येत्या 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिल केली जाणार आहे. या मॉक ड्रिलमध्ये युद्ध चालू झाल्यास नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, याच कारणामुळे पाकिस्तानची मात्र झोप उडाली आहे. भारतात मॉक ड्रिलची तयारी चाललेली असताना पाकिस्तान मात्र तणावात आहे.
भारतात 7 मे रोजी सगळीकडे एअर रेड वॉर्निंग सायरन आणि ब्लॅकआऊट केलं जाणार आहे. युद्ध चालू झाल्यावर नागरिकांनी नेमकं काय करावं? याची माहिती या मॉक ड्रिलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. देशात एकूण 244 जिल्ह्यांत ही मॉक ड्रिल केली जाणार आहे. याच कारणामुळे पाकिस्तानात मात्र सगले चिंताग्रस्त झाले आहेत.
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने मॉक ड्रिलचा आदेश दिल्यानंतर पाकिस्तानच्या इस्लामामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. 5 मेपासून येथे तणावाची स्थिती आहे. भारताची मॉक ड्रिलची तयारी पाहून पाकिस्ताचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आयएसआयच्या मुख्यालयात धाव घेतली आहे. त्यांनी आयसआयच्या मुख्यालयात एक बैठक घेतली आहे. या बैठकीत भारताची मॉक ड्रिल तसेच इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे.
शाहबाज शरीफ यांनी घेतलेल्या या बैठकीला आयएसआयचे प्रमुख तसेच पाकिस्तानच्या लष्कराचे प्रमुख आसिम मुनीर हेदेखील उपस्थित होते. या बैठकीत भारताच्या मॉक ड्रिलवर चर्चा करण्यात आली.
पाकिस्तानच्या संसदेतही भारताच्या या मॉक ड्रिलचे पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानच्या संसदेत 5 मे रोजी विशेष सत्र बोलवण्यात आले होते. या सत्रातही भारताविरोधात गरळ ओकण्यात आली. दरम्यान, आता 7 मे रोजी भारतात मॉक ड्रिल होणार आहे. या मॉक ड्रिलनंतर पुढे काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भारताच्या मॉक ड्रिलनंतर पाकिस्तान नेमकी काय भूमिका घेणार, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.