AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मैत्री, फ्लर्ट सर्व काही, पण शरीर संबंध… मोसादच्या फिमेल एजंट कशा करतात काम? जाणून घ्या टॉप सीक्रेट

इस्रायलच्या मोसाद संघटनेतील महिला गुप्तहेरांच्या जीवन आणि कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. त्यांच्या धाडसी मोहिमा, धोके आणि त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील आव्हानांचा समावेश आहे. लेखात मोसादच्या महिला एजंट्सना भेडसावणाऱ्या मर्यादा आणि त्यांच्या कामकाजाची पद्धत स्पष्ट करण्यात आली आहे. देशभक्ती आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी त्यांच्या समर्पणाची कथा यात सांगितली आहे.

मैत्री, फ्लर्ट सर्व काही, पण शरीर संबंध... मोसादच्या फिमेल एजंट कशा करतात काम? जाणून घ्या टॉप सीक्रेट
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 23, 2025 | 10:06 AM
Share

पुन्हा एकदा मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर संघटनेची चर्चा सुरू झाली आहे. निमित्त आहे, इस्रायल आणि इराण दरम्यानचं युद्ध. या काळात इस्रायलच्या मोसादने इराणच्या अणु शास्त्रज्ञांचा काटा काढला आहे. इराणमध्ये घुसून टॉप एक्सपर्टला मोसादने संपवलं आहे. मोसादच्या महिला ब्रिगेडने हे मिशन लिलया पार पाडलं आहे. त्यामुळे मोसादच नव्हे तर मोसादच्या या लेडी ब्रिगेडचीही चर्चा सुरू झाली आहे. या महिला एजंट एखाद्याची शिकार कशी करतात याचं कुतुहूल वाढलं आहे. त्यांचं कामकाज कसं चालतं यावर टाकलेला हा प्रकाश.

जगभरात कुठेही लपून बसलेल्या आपल्या शत्रूंना शोधून त्याला कायमचं जगातून संपवण्याचं काम मोसाद करतं. मोसादची काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. मोसादमध्ये मेल एजंटसह फिमेल एजंटही आहेत. त्याला लेडी ब्रिगेड म्हटलं जातं. या लेडी ब्रिगेड म्हणजे ब्यूटी विथ ब्रेन असतात. कोणतंही कठिण काम त्या लिलया पार पाडतात. आपल्या सौंदर्याच्या बळावर समोरच्या व्यक्तीला घायाळ करणं आणि त्याला जाळ्यात ओढणं यात या ललना तरबेज असतात.

टाइम्स ऑफ इस्रायलमधील एका जुन्या रिपोर्टमध्ये यावर प्रकाश टाकण्यात आला होता. मोसादच्या फिमेल एजंट उच्च पदावरून हेरगिरी करण्याचं काम करण्यातही एक्सपर्ट असतात. पण या महिला एजंटांना मिशनच्या दरम्यान काही मर्यादा घालून दिलेल्या असतात. या मर्यादा पाळूनच त्यांनी मिशन पूर्ण करावं लागतं. मोसादच्या महिला एजंटांचं आयुष्य एकाखाद्या सिनेमासारखं असतं. पण तेवढं आकर्षक नसतं. त्या फक्त आणि फक्त देशासाठी मिशन पार पाडत असतात.

कोणत्या थरापर्यंत जातात?

एका फिमेल एजंटने सीक्रेट सर्व्हिसमध्ये काम करताना काय करावं लागतं याची माहिती दिली होती. तिच्या म्हणण्यानुसार, या महिला मिशन पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जातात याची माहिती तिने दिली आहे. मिशन कितीही मोठं आणि महत्त्वाचं असो, काही मर्यादा पाळाव्या लागतात. जोपर्यंत त्यांना सांगितलं जात नाही, तोपर्यंत त्या कोणत्याही थराला जात नाहीत.

महिला एजेंटने सांगितले की, जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा छेडछाड योग्य ठरते, कारण प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये पुरुषांना प्रवेश मिळण्याची शक्यता कमी असते. पण हसऱ्या चेहऱ्याने जाणाऱ्या महिलेला यश मिळण्याची शक्यता जास्त असते. या महिला कमांडर किंवा त्याहूनही उच्च पदांवर कार्यरत आहेत आणि एजन्सीच्या काही अत्यंत धाडसी व महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या आहेत.

दोस्ती, फ्लर्ट सर्व चालतं, पण…

आम्ही मिशन पूर्ण करण्यासाठी आमच्या स्त्रीत्वाचा उपयोग करतो. कारण मिशन पूर्ण करण्यासाठी कोणतीही पद्धत योग्यच आहे. पण मिशन पुढे नेण्यासाठी कुणासोबत तरी झोपण्याची वेळ येते तेव्हा मोसाद आम्हाला असं करण्याची परवानगी देत नाही. एजंटांच्या शरीराचा वापर केला जात नाही. आम्ही फ्लर्ट करतो, पण सेक्स करण्यास आम्हाला मनाई असते, असं या महिलेने सांगितलं.

मोसादमध्ये कोणत्या महिलांना एन्ट्री?

मोसादमध्ये महिला एजंटांची भरती करणं कठीण आहे. कारण पकडलं गेल्यास थेट मृत्यूशी गाठ असल्याचं त्यांना माहीत असतं. पण देशाच्या सुरक्षेसाठी प्रत्येकवेळी धोका पत्करावा लागतो. त्यामुळेच मोसादमधील सर्वाधिक महिला एजंट या सिंगल असतात. कारण कुटुंबवत्सल महिलांची जीवनशैली आव्हानात्मक, भावनिक आणि किचकट असते, असंही या महिलेने सांगितलं.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.