
एक महिला आपल्या 13 वर्षांच्या मुलीला घेऊन तिचे दात चेक करण्यासाठी एका डेटिस्टकडे गेली होती, मात्र त्यानंतर जे घडलं त्यामुळे या महिलेला प्रचंड धक्का बसला आहे, डॉक्टरांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं आहे. मेडिकल मिस्ट्री सारखी ही घटना समोर आली आहे. ही घटना अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील आहे. जाणून घेऊयात नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
न्यूजवीकने दिलेल्या माहितीनुसार ओफिलिया ( महिलेचं नाव बदललं आहे) आपल्या तेरा वर्षांच्या मुलीला ब्रेसेजची प्रक्रिया सुरू करण्यासाटी ऑर्थोडॉन्टिस्ट घेऊन गेली होती. हे एक रूटीन चेकअप होतं. मात्र जेव्हा डॉक्टरांनी या मुलीचा एक्स-रे काढला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या घटनेबाबत बोलताना ओफिलियानं सांगितलं की मी आणि डॉक्टर एकाचवेळी हा एक्स-रे पाहात होतो. सुरुवातीला आम्हाला काहीच कळालं नाही, हे नेमकं काय आहे?
एक्स- रे मध्ये हे स्पष्ट दिसत होतं की मुलीच्या साइनसमध्ये एक धातुचा छोटा तुकडा अडकला आहे. यामुळे डॉक्टर आणि मुलीच्या आईला मोठा धक्का बसला. मात्र मुलीला लगेच कळालं नेमकं काय घडलं आहे?
सहा महिन्यांपूर्वी काय घडलं होतं?
सहा महिन्यांपूर्वी या मुलीने आपल्या आईकडे आपलं नाक टोचण्याचा हट्ट केला होता. काही दिवसांपूर्वी तिच्या मैत्रीणीने देखील नाक टोचलं होतं, त्यामुळे या मुलीला देखील वाटलं की आपण पण आपलं नाक टोचावं, म्हणून तिने तिच्या आईकडे आपली इच्छा व्यक्त केली. पण तिच्या आईने तिचं नाक टोचण्यासाठी स्पष्ट नकार दिला, तू 16 वर्षांची झाल्यानंतर आपण तुझं नाक टोचू असं देखील या महिलेनं आपल्या मुलीला सांगितलं होतं.
मात्र मुलीनं आईचं ऐकलं नाही आणि स्वत: एका इअर रिंगने आपलं नाक टोचण्याचा प्रयत्न केला. मात्र या एअर रिंगचा एक तुकडा मुलीच्या सायनसमध्ये अडकला, आई आपल्याला रागवेल म्हणून तिने आईला देखील ही गोष्ट सांगितली नाही, मात्र जेव्हा तिला त्रास होऊ लागला, जेव्हा एक्स-रे काढण्यात आला, तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.