Chinese Fighter Jet : अरेरे चीनची इज्जत गेली, 1933 सालच्या मशीन गनने चीनच 72 कोटीच फायटर जेट पाडलं, पुरावे आले समोर

Chinese Fighter Jet : चीनच साधंसुध नाही, JF-17 हे अत्याधुनिक फायटर जेट एका साध्या मशीनगनद्वारे पाडण्यात आलय. पाकिस्तानला सुद्धा या विमानाबद्दल गर्व आहे, कारण हे फायटर जेट त्यांच्या ताफ्यात आहे. या घटनेने चिनी शस्त्रास्त्रांच्या क्वालिटीबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.

Chinese Fighter Jet : अरेरे चीनची इज्जत गेली, 1933 सालच्या मशीन गनने चीनच 72 कोटीच फायटर जेट पाडलं, पुरावे आले समोर
gun
| Updated on: Jun 11, 2025 | 1:16 PM

म्यानमारमध्ये 2017 सालापासून हिंसाचार सुरु आहे. 2021 मध्ये आंग सान सू यांची सत्ता गेल्यापासून देशात गृहयुद्ध सुरु आहे. बंडखोर संघटना आणि म्यानमार सैन्य आमने-सामने आहे. मंगळवारी या लढाईत एक चक्रावून सोडणारी घटना घडली. बंडखोर गटाने PLA (People’s Liberation Army) चीनच अत्याधुनिक मानलं जाणारं JF-17 हे फायटर जेट साध्या मशीन गनने पाडलं. या घटनेची सगळया जगभरात चर्चा आहे. पाकिस्तानला सुद्धा चिनी बनावटीच्या या JF-17 चा अभिमान आहे. त्यांच्या एअरफोर्सकडे ही विमानं आहेत. लोक आता JF-17 ऐवजी त्या मशीन गनची चर्चा करत आहेत, ज्याने हे विमान पाडण्यात आलं. ती मशीन गन कुठली याची उत्सुक्ता आहे, ज्याने चीनच 72 कोटीच फायटर जेट पाडलं.

PLA प्रवक्ता दाव नी नी क्यावने सांगितलं की, “आम्ही पुष्टी करु शकतो, आम्ही मंगळवारी दुपारी 12.15 वाजता जुंटा फायटर जेट पाडलं” 2021 साली सत्तापालट झाल्यापासून बंडखोर गटांनी पाडलेलं हे कमीत कमी 10 व सरकारी विमान आहे.

या गनची निर्मिती कुठल्या देशाने केलीय?

बंडखोर गटांनी जुंटाच फायटर जेट पाडण्यासाठी 0.50-कॅलिबर M2 ब्राउनिंग मशीन गनचा वापर केला. स्थानिक प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने ‘द इरावाडी’ ने ही बातमी दिली. 0.50-कॅलिबर M2 ब्राउनिंग ही अमेरिका निर्मित मशीन गन आहे. हे विमान युद्ध स्थळाजवळ एका गावात दुर्घटनाग्रस्त होऊन कोसळलं. स्फोटानंतर त्यात आग लागली.

विमानाचे तुकडे विखरुन पडले

PLA ने पोस्ट केलेल्या व्हिडिओत एका जळणाऱ्या गावात इमारतीच्याजवळ दुर्घटनाग्रस्त विमानाचे तुकडे विखरुन पडल्याचे दिसतात. व्हिडिओमध्ये मृतदेहाचा एक भाग देखील दिसतोय. तो पायलट असण्याची शक्यता आहे.


किती दशक जुनी आहे ही मशीन गन?

M2 ब्राउनिंग हेवी मशीन गनची डिजाइन अमेरिकेत बनवण्यात आली. 1933 पासून ही गन वापरात आहे. आजही या गनचा वापर केला जातो. यात अनेक बदल झाले आहेत. M2 अनेक लढायामध्ये बंडखोर संघटनांसाठी भरवशाच शस्त्र राहिलं आहे. अनेक युद्धात या गनचा वापर झाला आहे. म्यानमारमध्ये सुद्धा बंडखोर संघटना या गनचा वापर करत आहेत. कारण त्यांच्याकडे आधुनिक शस्त्र नाहीयत. म्हणूनच ते ड्रोन आणि विमानं याच मशीन गनच्या मदतीने पाडत आहेत.