Iran Israel : अखेर भारत मैदानात उतरला, मोदींचा थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन; आता भारताला मोठं गिफ्ट?

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. या युद्धामुळे भारतालाही मोठा फटका बसत आहे. असे असतानाच आता नरेंद्र मोदी यांनी थेट इराणच्या राष्ट्रपतींना कॉल केला आहे. कॉल करून त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे.

Iran Israel : अखेर भारत मैदानात उतरला, मोदींचा थेट इराणच्या राष्ट्रपतींना फोन; आता भारताला मोठं गिफ्ट?
narendra modi and masoud pezeshkian
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2026 | 6:27 PM

Narendra Modi On Iran Israel War : सध्या आखाती देश युद्धामुळे होरपळले आहेत. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर मोठे हल्ले हल्ले केले जात आहेत. तर या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराण सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवैत यासारख्या देशांना लक्ष्य करत आहे. इराणने या देशांच्या तेल प्रकल्पांवरच हल्ले केल्यामुळे जगापुढे उर्जासंकटाचं भीषण संकट आणखी गडत झालं. भारतालाही याचा फटका बसतोय. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने कच्च्या तेलाने तसेच नैसर्गिक वायूने भरलेली जहाजं भारतात येत नाहीयेत. परिणामी घरगुती गॅस सिलिंडर महागले आहे. तसेच भविष्यात पेट्रोल, डिझेलचा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताकडून वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. भारताकडून रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेकडून तेलाची खरेदी केली जात आहे. दरम्यान, इराण-इस्रायल युद्ध आणखी गडत होत असताना भारताने मोठे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्रपती डॉ. मसुद पेझेशकियान यांना थेट फोन कॉल केला आहे.

पश्चिम आशियात पुन्हा एकदा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. मसुद पेझेशकियान यांना फोन कॉल करून त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच तेलपुरवठा खंडित होऊ नये, यासाठीही त्यांनी चर्चा केली आहे. या फोन कॉलनंतर मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या फोन कॉल तसेच दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेबद्दल सविस्तर सांगितले आहे. “मी डॉ. मसुद पेझेसकियान यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. त्यांना इद आणि नवरोजनिमित्त शुभेच्छा दिल्या. सणांचे हे पर्व पश्चिम आशियात पुन्हा एकदा शांतता, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करेल, अशी आशा आम्ही व्यक्त केली,” असे मोदी यांनी या पोस्टमध्ये सांगितले.

जहाज प्रवासाचे स्वातंत्र्य…

तसेच, इराणमधील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर होत असलेल्या हल्ल्यांवरही मी प्रतिक्रिया दिली. या हल्ल्यांमुळे प्रादेशिक स्थैर्याला तसेच जागतिक पुरवठा सागखीळा भीती निर्माण झाल्याची चर्चाही झाल्याचे मोदी यांनी सांगितले. आमच्या संवादात मी जहाज प्रवासाचे स्वातंत्र्य अधोरेखित केले. तसेच मालवाहून रस्ते हे खुले आणि सुरक्षित असायला हवेत, असेही मत व्यक्त केले. युद्धाच्या काळात इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षेसाठी भारताला इराण सहकार्य करत आहे, याचेही कौतुक केल्याचे मोदींनी सांगितले आहे. दरम्यान, या फोन कॉलमुळे भविष्यात इराण मोदींसाठी मोठा निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us