AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Natanz Nuclear Radidation Leak : मोठी बातमी, इराणमध्ये न्यूक्लियर रेडीएशन लीक, IAEA ने जगाला दिली हादरवून टाकणारी बातमी

Natanz Nuclear Radidation Leak : इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या अणवस्त्र प्रकल्पातून रेडीएशन लीक होत असल्याचा इन्कार केला होता. पण आंतरराष्ट्री अणूऊर्जा एजन्सी IAEA चे प्रमुख रॉफेल ग्रॉसी यांनी इराणने दिलेल्या खोटया माहितीचा पदार्फाश केलाय. त्यांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी बातमी दिली आहे.

Natanz Nuclear Radidation Leak : मोठी बातमी, इराणमध्ये न्यूक्लियर रेडीएशन लीक, IAEA ने जगाला दिली हादरवून टाकणारी बातमी
Iran Israel War
Updated on: Jun 14, 2025 | 1:55 PM
Share

इराणच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले झाल्यानंतर सगळ्या जगाची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी आहे. इस्रायलने गुरुवारी रात्रा आणि शुक्रवारी सकाळी इराणमधील विविध अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ले केले. इराणला अणूबॉम्ब बनवण्यापासून रोखणं या उद्देशाने हे हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात इरणच्या अणवस्त्र प्रकल्पांच नुकसान झाल आहेच. पण आता चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. हल्ल्यानंतर इराणने त्यांच्या अणवस्त्र प्रकल्पातून रेडीएशन लीक होत असल्याचा इन्कार केला होता. पण आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सीने यूएनला दिलेली माहिती हादरवून टाकणारी आहे.

इराणच्या नतांज अणवस्त्र प्रकल्पावर एकदिवसापूर्वी इस्रायलने हल्ला केला होता. इराणने म्हटलेलं की, हा हल्ला वर पुष्ठभागावर झालाय. त्यातून न्यूक्लियर रेडीएशन लीक होण्याची शक्यता नाहीय. पण आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा एजन्सी IAEA चे प्रमुख रॉफेल ग्रॉसी यांनी इराणने दिलेल्या खोटया माहितीचा पदार्फाश केलाय. इस्रायली हल्ल्यानंतर इराणी अणूभट्टीवर बाहेरुन नाही, पण अंतर्गत रेडिएशन सुरु झालय, असं रॉफेल ग्रॉसी म्हणाले.

कशामुळे न्यूक्लियर रेडिएशन लीक?

IAEA चीफ ग्रॉसी यांनी सांगितलं की, इराणच्या नतांज अण्विक तळावर हल्ला करुन त्याच्या वरच्या भागाला नष्ट करण्यात आलय. या हल्ल्यामुळे जमिनीच्या आत साठवून ठेवलेल्या यूरेनियम संवर्धनाच कुठलही नुकसान झाल्याची शक्यता नाहीय. पण तरी सुद्धा साइटवर न्यूक्लियर रेडिएशन सुरु झालय. हल्ल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झालाय. त्यामुळे सेंट्रीफ्यूज प्रभावित होऊ शकतात. त्यामुळेच न्यूक्लियर रेडिएशनच लीकेज सुरु झालय.

कुठपर्यंत पोहोचलय रेडिएशन लीक?

नतांज अण्विक तळाच्या आसपास बाहेर अजूनपर्यंत हे रेडिएशन पोहोचलेलं नाही. पण अंतर्गत सतत त्यामध्ये वाढ होत आहे, असं IAEA ने म्हटलं आहे. ग्रॉसी म्हणाले की, “आत्ताच योग्य व्यवस्था केली, काळजी घेतली तर हा धोका टाळता येऊ शकतो. त्यांनी सर्वच पक्षांना संयम बाळगण्याच आवाहन केलं आहे” इस्रायलकडून अशीच कारवाई सुरु राहिली, तर इराणवर त्याचे गंभीर परिणाम होतील.

इराणचा दावा काय?

इराणच्या अणूऊर्जा संस्थेने दावा केलाय की, कुठलीही गळती झालेली नाही. इराणचे प्रवक्ते बेहरोज कमालवंदी यांनी सर्वकाही ठीक असल्याचा दावा केला. लवकरच पुन्हा संचालन सुरु होईल. ग्रॉसी यांनी सांगितलं की, इराणी अधिकाऱ्यांनी अण्विक प्रकल्प प्रभावित झाल्याची माहिती दिली. ग्रॉसी म्हणाले की, “हा घटनाक्रम चिंताजनक आहे. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही देशाच्या अण्विक तळांना लक्ष्य करु नये”

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.