Ajmal kasab : अजमल कसाबचा पत्ता भारताला नवाज शरीफ यांनी दिला, पाकिस्तानी मंत्र्याचा खळबळजनक दावा

नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांनीच भारताला अजमल कसाबचा (Ajmal Kasab) पत्ता दिल्याचा दावा शेख राशिद यांनी केला आहे. इम्रान खान सरकारमधील मंत्री शेख राशिद यांनी केलेल्या वक्तव्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

Ajmal kasab : अजमल कसाबचा पत्ता भारताला नवाज शरीफ यांनी दिला, पाकिस्तानी मंत्र्याचा खळबळजनक दावा
शेख राशीद यांचा खळबळजनक दावा
Image Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Mar 31, 2022 | 12:00 PM

नवी दिल्ली : पाकिस्तानतलं इम्रान खान (Imran Khan) सरकार सध्या धोक्यात आहे. सरकार वाचवण्यासाठी इम्रान खान शेवटच्या बॉलपर्यंत मॅच खेचत आहेत. त्यातच आता एका पाकिस्तानी मंत्र्यानं खळबळजन वक्तव्य केले आहे. नवाज शरीफ (Nawaz Sharif) यांनीच भारताला अजमल कसाबचा (Ajmal Kasab) पत्ता दिल्याचा दावा शेख राशिद यांनी केला आहे. इम्रान खान सरकारमधील मंत्री शेख राशिद यांनी केलेल्या वक्तव्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अजमल कसाब हा 26-11 च्या हल्ल्यात भारताने जिवंत पकडला होता. या हल्ल्याच्या जखमा भारत कधीच विसरू शकणार नाही. ते पुढे म्हणाले की, नवाझ शरीफ यांना सद्दाम हुसेन, मुअम्मर गद्दाफी आणि ओसामा बिन लादेन यांच्याकडून निधी मिळाला होता. त्यामुळे फक्त भारतातूनच नाही तर जगभरात या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. पाकिस्तानातील नेत्यांनी आधी दुसऱ्या देशातील लोकांकडून माल कमावण्याचे, म्हणजेच पैसे खाण्याचे उद्योग केले, असाही आरोप त्यांनी केला आहे.

मंत्र्यांच्या या वक्तव्याने खळबळ

विरोधकांवर सडकून टीका

त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आणि असा दावा केला की त्यांनी पैशासाठी आपली विवेकबुद्धी विकली आणि पाकिस्तानची प्रतिमा मलिन केली.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव नॅशनल असेंब्लीमध्ये मांडण्यात आल्यानंतर एकूण 161 मतांच्या बाजूने ही कारवाई 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली. 8 मार्च रोजी विरोधी पक्षांनी सरकारवर अविश्वास ठराव दाखल केला. पीटीआयचे अनेक आमदार पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात उघडपणे समोर आले आहेत, त्यामुळे विरोधकांना आपला प्रस्ताव मंजूर होईल याची खात्री आहे.

दावा चुकीचा ठरल्यास वाट्टेल ती शिक्षा

हा दावा करताना, माझे म्हणणे चुकीचे सिद्ध झाले तर चोराची शिक्षा हीच माझी शिक्षा आहे, असेही त्यांनी छातीठोकपणे सांगितले. त्यांनी इम्रान खान यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. इम्रान खान यांना उद्देशून बोलताना ते म्हणाले, मी तुम्हाला विनंती करतो. इम्रान खान हे एका जागेचे नेते आहेत. मी आयुष्यभर दोन आणि एका जागेचे राजकारण केले आहे. पण इम्रान खान यांच्यासोबत मी राजकारण केल्याचा मला अभिमान आहे. असे म्हणत त्यांनी इम्रान खान यांचे कौतुक केले आहे. पाकिस्तानी मंत्र्याच्या या दाव्यावर मात्र भारताकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.

Imran Khan: शेवटच्या चेंडूपर्यंत खेळणार, इमरान खान यांच्या भेटीला आर्मी चीफ, ISI चे डीजी; पाकिस्तानात राजकीय घडामोडींना वेग

Imran Khan: खतरे में कुर्सी! अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या आधीच इमरान खान यांचा राजीनामा?; आज संध्याकाळी देशाला संबोधित करणार

इम्रान खान सरकारची गच्छंती अटळ; अविश्वास ठरावापूर्वीच ‘एमक्यूएमने’ सरकारचा पाठिंबा काढला