Nawaz Sharif on Imran Khan| इम्रान खान यांच्या आत्महत्येची मी वाट पाहतोय, का आक्रमक झालेत नवाज शरीफ?

| Updated on: Dec 25, 2021 | 12:31 PM

सध्या 71 वर्षांचे असणारे नवाज शरीफ 2019 पासून लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना लाहौर उच्च न्यायालयाने चार आठवड्यासाठी परदेशात उपचारासाठी जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर ते अजून तरी मायदेशी परतले नाहीत.

Nawaz Sharif on Imran Khan| इम्रान खान यांच्या आत्महत्येची मी वाट पाहतोय, का आक्रमक झालेत नवाज शरीफ?
इम्रान खान आणि नवाज शरीफ (सौजन्यः गुगल)
Follow us on

इस्लामाबादः पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आत्महत्या करावी, असे वाटतेय पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना. मी इम्रान खान यांच्या आत्महत्येची वाट पहातोय, असे म्हणत त्यांनी थेट ब्रिटनमधून त्यांच्यावर निशाणा साधलाय. लाहौरमध्ये पाकिस्नान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) पक्षाने एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शरीफ यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी हे तोंडसुख घेतले.

महापौरापेक्षाही कमी अधिकार

नवाज शरीफ म्हणाले, क्रिकेटमधून राजकारणात आलेले इम्रान खान म्हणतात की, आंततराराष्टरीय नाणेनिधीत जाण्याऐवजी आपण आत्महत्या करू. मग ते असं कधी करणार, याची वाट आम्ही पहात आहोत. भारतात इम्रान यांना चक्क कठपुतळी म्हटले जाते. अमेरिकेत तर त्यांना महापौरापेक्षाही कमी अधिकार असल्याचे म्हटले जाते. हे यासाठीच की साऱ्या जगाला माहितीय, त्यांना सत्तेत कसे आणले ते. इम्रान सर्वसामान्यांच्या मतावर सत्तेत आले नाहीत. त्यांनी सैन्याच्या मदतीने सत्ता मिळवली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आर्मी चीफनांही घेरले

सध्या 71 वर्षांचे असणारे नवाज शरीफ 2019 पासून लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना लाहौर उच्च न्यायालयाने चार आठवड्यासाठी परदेशात उपचारासाठी जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, त्यानंतर ते अजून तरी मायदेशी परतले नाहीत. यावेळी त्यांनी पाकिस्तनानचे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा यांच्यावरही जोरदार टीका केली. 2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी इम्रान खान यांना सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांना आयएसआयचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांनी मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला.

का होतेय टीका?

सध्या पाकिस्तान कर्जात बुडाले आहे. मात्र, इम्रान खान यांनी यापूर्वीच्या सरकारवर आतंरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतल्याबद्दल जोरदार टीका केली होती. आता त्याचाच दाखला देत इम्रान यांच्यावर शरीफ यांनी शरसंधान साधले आहे. इम्रान सरकारने 2018 मध्ये सत्तेत आल्यानंतर आपल्या पहिल्या तीन वर्षांतच इतर देशांकडून आणि संस्थांकडून तब्बल 34 बिलियन अमेरिकी डॉलर कर्ज घेतले आहे.

पाकिस्तान अधोगतीकडे

इम्रान खान यांच्यासारख्या अयोग्य आणि नाकर्त्या व्यक्तीच्या हाती पाकिस्तानची सत्ता दिली आहे. त्यामुळे देश अधोगतीकडे चालला आहे. त्यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त केली. घटनेला कधीही सर्वोच्च मानले नाही. कधी शपथेचा सन्मान केला नाही. पाकिस्तानला प्रगतीकडे वाटचाल करायचे असेल, तर भूतकाळातून काही शिकावे, असे आवाहनही नवाज शरीफ यांनी केले आहे.

इतर बातम्याः

लग्नसंस्था कुठल्या दिशेने चाललीय? लग्न जुळवले, ‘लिव्ह इन’मध्ये राहिले, हुंड्यासाठी दुसरीचाच हात पकडला!

खोटे गुन्हे नोंद करणारे तुम्ही, अत्याचार करणारे तुम्ही, मग आम्हाला गोळ्याही तुम्हीच घाला; सुजाता पाटील यांचा आक्रोश