लग्नसंस्था कुठल्या दिशेने चाललीय? लग्न जुळवले, ‘लिव्ह इन’मध्ये राहिले, हुंड्यासाठी दुसरीचाच हात पकडला!

औरंगाबादः सामाजिक सुरक्षितता, नातेसंबंधातील निकोप देवाण-घेवाण, कौटुंबिक सलोख्यासाठी उभी राहिलेली लग्नसंस्था (Marriage systeme) नेमकी कुठल्या दिशेने झेपावतेय, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. हा प्रश्न विचारला जावा, अशा घटना अनेक घडतात. पण निमित्त ठरलंय औरंगाबादमधील एका घटनेचं. शिक्षण घेतेनाच कुटुंबातील सदस्यांनी नात्यातील एक मुलीचे मुलाशी लग्न ठरवले. नियोजित वधू-वर दोघेही काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. […]

लग्नसंस्था कुठल्या दिशेने चाललीय? लग्न जुळवले, 'लिव्ह इन'मध्ये राहिले, हुंड्यासाठी दुसरीचाच हात पकडला!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 25, 2021 | 11:37 AM

औरंगाबादः सामाजिक सुरक्षितता, नातेसंबंधातील निकोप देवाण-घेवाण, कौटुंबिक सलोख्यासाठी उभी राहिलेली लग्नसंस्था (Marriage systeme) नेमकी कुठल्या दिशेने झेपावतेय, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. हा प्रश्न विचारला जावा, अशा घटना अनेक घडतात. पण निमित्त ठरलंय औरंगाबादमधील एका घटनेचं. शिक्षण घेतेनाच कुटुंबातील सदस्यांनी नात्यातील एक मुलीचे मुलाशी लग्न ठरवले. नियोजित वधू-वर दोघेही काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मग नवरदेवाने अचानक 20 लाख रुपयांचा हुंडा मागितला. पण ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्याने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात पीडितेने दाखल केली आहे.

काय घडलं नेमकं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद विद्यापीठात एमफिल करणाऱ्या विद्यार्थिनीचे नात्यातील एका मुलासोबत 2016 मध्ये प्राथमिक बोलणीनंतर लग्न जमले. दोघांनीही शिक्षण झाल्यानंतर लग्न करू, असा प्रस्ताव कुटुंबियांसमोर ठेवला. शिक्षण सुरु असताना पीडिता वसतिगृहात राहत होती. तेव्हा मुलगा मुलांच्या वसतिगृहात राहत होता. लग्न ठरल्यामुळे दोघांचे फोनवर बोलणे, भेटणे वाढले. मार्च 2020 मध्ये कोरोना काळात वसतिगृह बंद झाल्यामुळे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

हुंड्यावरून उडाले खटके

दरम्यान काही दिवसांनी मुलाने हुंड्यासाठी मुलीकडे तसेच तिच्या कुटुंबियांकडे हट्ट केला. मात्र हुंडा देण्यास सदर कुटुंबियांनी नकार दिला. पीडिता घरी निघून आली. तेव्हा मुलाने 28 मे 2021 रोजी माजलगाव तालुक्यातील एका मुलीशी लग्न केले. ही माहिती मिळाल्यानंतर पीडितेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी गुन्हा दाखल करून घेत, अधिक तपासासाठी प्रकरण उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे सोपवले आहे.

इतर बातम्या-

Nagpur Corona | वडिलांचा कोरोनामुळं ऑक्सिजनअभावी मृत्यू, मुलांनी जयंतीदिनी घालून दिला नवा आदर्श!

#Hruteek | ‘दिल मिल गये….’, पार पडला ‘फुलपाखरू’ फेम हृता दुर्गुळेचा साखरपुडा, पाहा फोटो!

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.