AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal New PM: इंजिनिअर ते रॅपर! नेपाळमध्ये शाहांचं राज्य, या नेत्याला पंतप्रधान पदाची लॉटरी?

Nepal New PM: नेपाळमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरु आहे. नेपाळचे पंतप्रधान ओली हे देशसोडून पळून गेल्याचे म्हटले जात आहे. ते अज्ञातस्थळी लपून बसले आहेत. त्यानंतर आता महापौर यांनाच पंतप्रधान बनवण्याची मागणी केली जात आहे.

Nepal New PM: इंजिनिअर ते रॅपर! नेपाळमध्ये शाहांचं राज्य, या नेत्याला पंतप्रधान पदाची लॉटरी?
Nepal PMImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 09, 2025 | 5:09 PM
Share

सध्या नेपाळमध्ये अराजक माजले आहे. सोशल मीडियावर घातलेल्या बंदीमुळे Gen Z रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. काही नेत्यांच्या घरांवर देखील तरुणांनी हल्ला केला. त्यानंतर ओली सरकारमधील तीन नेत्यांनी राजिनामा दिला. त्यापाठोपाठ नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी देखील राजिनामा दिला. त्यांच्या राजिनाम्यानंतर काठमांडूमध्ये जल्लोष करण्यात आला. आता एका महापौराचे नाव पंतप्रधान पदासाठी घेतले जात आहे. Gen Zकडून या महापौरला पंतप्रधान बनवण्याची मागणी होत आहे.

कोण आहेत हे महापौर?

सध्या नेपाळमध्ये मोठी राजकिय उलथापालथ झाली आहे. नेपाळमधील सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी बालेश शाह आहेत. बालेन शाह हे काठमांडूचे महापौर आहेत. तरुणांमध्ये त्यांची प्रचंड लोकप्रियता आहे. बालेन शाह यांनी सोशल मीडियावरील बंदी विरोधात काढण्यात आलेल्या Gen Zच्या रॅलीला पाठिंबा दर्शवला होता. बालेश शाह यांनी महापौर पदाचा राजिनामा देऊन देशाची धूरा सांभाळावी अशी मागणी Gen Z आंदोलकांनी केली आहे.

वाचा: मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज चढला, तोच उतरविण्यासाठी…; लालबाग राजाच्या विसर्जनानंतर कोणी पाठवलं CMला पत्र

सोशल मीडियाविरोधातील रॅलीला दिला होता पाठिंबा

मी आंदोलकांच्या आकांक्षा, उद्दीष्टे आणि विचार समजून घेऊ इच्छितो. राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, खासदार आणि प्रचारकांनी रॅलीचा स्वार्थासाठी वापर करु नये असे बालेन शाह यांनी म्हटले होते. याआधी पासूनच बालेश शाह यांचा केपी ओली यांच्याविरोधात संघर्ष सुरुच होता.

कोण आहेत बालेन शाह?

बालेन शाह यांनी सिव्हिल इंजिनीअर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ते रॅपर बनले आणि शेवटी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काठमांडूचे महापौर बनून त्यांनी तरुणांमध्ये लोकप्रियता मिळवली आणि पारंपरिक पक्षांपासून निराश झालेल्या लोकांमध्ये ते नायक बनले.

नेपाळमध्ये प्रदर्शन कसे सुरू झाले?

नेपाळमधील Gen-Z आंदोलनाची सुरुवात राजकारण्यांच्या मुलांच्या ऐषोआराम आणि सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीविरुद्ध झाली. तरुणांनी शांततापूर्ण विरोध प्रदर्शन सुरू केले, परंतु सरकारच्या कठोर कारवाईदरम्यान 23 लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण जखमी झाले. बालेन शाह यांनी या संपूर्ण आंदोलनात तरुणांचा विश्वास आणि पाठिंबा मिळवून नेतृत्व केले. सोशल मीडियावर #GenZMovement सारखे हॅशटॅग ट्रेंड करत आहेत आणि जनतेमध्ये राजकीय जागरूकतेची एक नवी लाट दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...