Nepal Flood: चीनने पहिल्यांदाच सांगितला मृतांचा आकडा, इमिग्रेशन बिल्डिंगमध्ये इतक्या जणांचा बळी, तर बेपत्ता किती?

Nepal Flood China Death Toll : नेपाळच्या विनाशकारी महापूरात मृतांचा आकडा 1295 पेक्षा अधिक झाला आहे. तर दुसरीकडे चीनने 26 ऑगस्टच्या या घटनेनंतर पहिल्यांदाच मृतांचा आकडा जाहीर केला आहे. इमिग्रेशन बिल्डिंगला या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला होता.

Nepal Flood: चीनने पहिल्यांदाच सांगितला मृतांचा आकडा, इमिग्रेशन बिल्डिंगमध्ये इतक्या जणांचा बळी, तर बेपत्ता किती?
नेपाळ, चीन
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 05, 2026 | 9:56 AM

Nepal Flood Deaths: नेपाळमध्ये आलेल्या महापूरात आतापर्यंत 1295 हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर अद्याप 5 हजाराहून अधिक नागरीक बेपत्ता आहेत. नेपाळच्या महापूरात मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे चीनने पहिल्यांदाच मृतांचा आकडा जाहीर केला आहे. लेंडे नदीला आलेल्या महापूराने इमिग्रेशन सेंटरला जोरदार फटका दिला. त्याचे भयावह व्हिडिओ समाज माध्यमांवर आहेत. इमिग्रेशन सेंटरमधून आतापर्यंत 31 जणांचे मृतदेह मिळाल्याची माहिती चीनने दिली आहे. तर अद्याप 531 लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने याविषयीचे वृत्त दिले आहे. यामध्ये चीन, नेपाळमधील नागरिकांसह इतर देशांचे पर्यटक, नागरिकांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व जण त्यादिवशी महापूरादरम्यान इमिग्रेशन सेंटर आणि परिसरात होते.

नेपाळमधून आतापर्यंत 169 भारतीयांची सुटका

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी माहिती दिली. त्यानुसार, नेपाळमध्ये विविध ठिकाणी अडकलेल्या 169 भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तीन नागरिकांची रसुवा जिल्ह्यातून गुरुवारी सुटका करण्यात आली. तर 275 भारतीय नागरीक अद्याप बेपत्ता आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी नेपाळमधील नैसर्गिक संकटानंतर भारताने केलेल्या मदतीविषयी माहिती दिली. हिमालयाच्या कुशीतील या देशाला भारताने आतापर्यंत 7 विमानातून जवळपास 95 टन साहित्य आणि 54 कर्मचाऱ्यांना मदतीसाठी पाठवले आहे.

भारत मदतकार्य सुरूच ठेवणार: MEA प्रवक्ते

जायसवाल यांनी स्पष्ट केले की नेपाळला भारत मदत कार्यात आखडता हात घेणार नाही. येत्या काही दिवसात फॉरेन्सिक किट, बेली ब्रिज आणि इतर अत्यावश्यक वस्तू पाठवण्यात येणार आहे. नेपाळ सरकारने या वस्तू पाठवण्याची भारताला विनंती केली होती. कालच भारताचे दोन विमान 21 टन अत्यावश्यक साहित्य घेऊन काठमांडू विमानतळावर उतरले. आतापर्यंत भारताने जवळपास 95 टन साहित्य ज्यात औषधं, फूड पॅकेट्स आणि इतर अत्यावश्यक गोष्टी नेपाळमध्ये पाठवल्या आहेत. तर बचाव आणि शोध मोहिमेसाठी 54 लोकांना पाठवले आहे. यामध्ये
30 टनल रेस्क्यू तज्ज्ञ, 19 फोरेंसिक तज्ज्ञ आणि पाच सदस्यीय मेडिकल पथकाचा समावेश आहे. हे पथक नेपाळच्या बचाव पथकाशी समन्वय साधून काम करत आहे.

275 नागरिक आतापर्यंत बेपत्ता, 1907 जणांची सुटका

नेपाळच्या महापूरात अद्याप 275 भारतीय नागरिकांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. तर 1,907 भारतीय नागरीक आतापर्यंत चीन, तिबेटमधून सुरक्षितरित्या नेपाळमध्ये पोहचले आहेत. चीनच्या अधिकृत सूत्रानुसार, तिबेटच्या स्वायत्त क्षेत्रात कोणताही भारतीय नागरीक नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us