नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधाशोध

नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच आहे. नेपाळमध्ये अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता आहे. बचाव पथकाची शोधाशोध सुरू आहे.

नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधाशोध
nepal flood
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 30, 2026 | 9:59 AM

नेपाळ-तिबेट सीमेवर पुराचा कहर सुरूच आहे. मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये मृत्यूचं तांडव सुरू आहे. या पुरामुळे हजारो नागरिक बेपत्ता झाले आहेत. भारताचे 275 हून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत 108 जणांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली. या पुरात भारताच्या 128 लोकांचा संपर्क होऊ शकलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत 598 भारतीय नागरिक चीनमधून नेपाळमध्ये सुरक्षितरित्या पोहोचले आहेत. भारताचे अद्याप 900 नागरिक चीनमध्ये आहे. ते सुरक्षित असून त्यांचा नातेवाईकांशी संपर्क होत आहे. भारताने उशिरा रात्री हवाई दलाच्या जवानांनी विमानाने 11 टन साहित्य चौथ्यांदा नेपाळला पाठवलं आहे. परराष्ट्र एस. जयशंकर यांनी सांगितलं की, विमानातून शोध आणि बचाव कार्यासाठी लागणारे उपकरणांसह एक पथक पाठवण्यात आलं आहे. यासहित डीएनए चाचणीसाठी लागणारे तज्ज्ञांचं पथक देखील पाठवण्यात आलं आहे.

नेपाळमध्ये आलेल्या पुरात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. काही भारतीय नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची ओळख पटवण्यासाठी काही पथके कार्यरत आहेत. नेपाळमध्ये पुराचा कहर अद्याप सुरू आहे. नुकतेच तब्बल 16 ट्रक भरून एकेरी मार्ग तयार करण्यासाठी लागणारं साहित्य नेपाळमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मंत्री एस. जयशंकर यांनी पाठवली. यासहित पोर्टेबल पूल बांधण्यासाठी लागणारे साहित्य देखील लवकरच पाठवले जाईल, असेह जयशंकर यांनी सांगितले. भारताने आतापर्यंत नेपाळमध्ये एकूण 68.5 टन साहित्य पाठवलं आहे.

नेपाळमधील भारतातील 108 नागरिकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. तर 50 नागरिक पुन्हा संपर्कात आले आहेत. चीननेही भारतीय नागरिकांची मदत केली. मागील दोन दोन दिवसांत 598 भारतीय नारिकांना चीनमधून सुरक्षितरित्या नेपाळमध्ये पाठवण्यात आलं आहे. नेपाळमध्ये भारताचे 275 हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. तर भारताचे 128 नागरिक संपर्काच्या बाहेर आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील रिपू कुमार, चेनेश्वर नरझरी, कृपा शंकर आणि मोहम्मद मिन्हाजुद्दीन या भारतीयांना रसुवा येथील जलविद्युत प्रकल्पातून वाचवण्यात आलं आहे.

Follow Us