AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर, भारतीय नागरिकासह 9 जण अटकेत, काठमांडूमध्ये संचारबंदी लागू

राजेशाहीवाद्यांच्या आंदोलनादरम्यान लुटमार केल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. रवी रंजन कुमार हे बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. राजधानी काठमांडूमध्ये लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. यावेळी अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली.

नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर, भारतीय नागरिकासह 9 जण अटकेत, काठमांडूमध्ये संचारबंदी लागू
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Mar 31, 2025 | 11:43 AM
Share

नेपाळमध्ये राजेशाहीच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने झाली. प्रशासनाने काठमांडूमध्ये संचारबंदी लागू केली असून लष्कर तैनात केले आहे. दरम्यान, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली भूकंपग्रस्त बँकॉक येथे सुरू असलेल्या बिमस्टेक परिषदेत सहभागी होण्यासाठी थायलंडला जाणार आहेत. दरम्यान, आंदोलनादरम्यान एका भारतीय नागरिकासह 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, राजेशाहीवाद्यांच्या आंदोलनादरम्यान लुटमार केल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. रवी रंजन कुमार हे बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहेत. काठमांडूतील एका डिपार्टमेंटल स्टोअरमधून दारू, फळे आणि मेकअपचे साहित्य लुटल्याच्या आरोपाखाली रंजन यांना अटक करण्यात आली आहे, यासंदर्भातलं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे

पदभार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान ओली यांचा हा पहिलाच थायलंड दौरा आहे. ओली मंगळवारी थायलंडला रवाना होतील.

थायलंडचे पंतप्रधान पाटोंगतरन शिनावात्रा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ओली थायलंडच्या पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. थायलंडमध्ये 1 ते 5 एप्रिल दरम्यान बिम्सटेक (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टोरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन) च्या सहाव्या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

आंदोलनादरम्यान दोघांचा मृत्यू काठमांडू: काठमांडूच्या बानेश्वर-टिंकुने भागात राजेशाही समर्थक आंदोलनादरम्यान आंदोलकांनी दगडफेक केली, एका राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला, वाहनांना आग लावली आणि दुकाने लुटली.

एकूण 110 जणांना अटक करण्यात आली दरम्यान, तोडफोडीच्या घटनेचा तपास करण्यासाठी काठमांडू जिल्हा न्यायालयाने राजेशाही समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाच्या (आरपीपी) नेत्यांसह 41 जणांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शुक्रवारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर समितीचे नेते नवराज सुबेदी यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याने गुरूंग समितीचे कार्यवाहक कमांडर म्हणून पदभार स्वीकारतील.

नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा स्थापनेसाठी आंदोलन तीव्र

तीन दिवसांपूर्वी नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे नेपाळ 2008 नंतर पुन्हा एकदा राजेशाही राष्ट्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे का, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात माजी राजा ज्ञानेंद्र यांनी नेपाळच्या जनतेचा पाठिंबा मागितला आणि काही दिवसांतच राजा आणि राजेशाही राष्ट्र परत मिळावे या मागणीसाठी जनता रस्त्यावर उतरली.

माजी राजा ज्ञानेंद्र म्हणाले होते की, देशाचे रक्षण आणि राष्ट्रीय एकता प्रस्थापित करण्याची जबाबदारी आता आमची आहे. तेव्हापासून नेपाळमध्ये राजेशाही पुन्हा स्थापन करण्याच्या मागणीसाठी निदर्शने तीव्र झाली आहेत.

रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...