New COVID Strain | कोरोनाच्या नव्या अवताराची डोकेदुखी, यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात 40 हजार रुग्ण

यूकेमध्ये आतापर्यंत 24 तासांच्या कालावधीत 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले नव्हते

New COVID Strain | कोरोनाच्या नव्या अवताराची डोकेदुखी, यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात 40 हजार रुग्ण
corona virus pune

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनमुळे (B.1.1.7.) यूकेमध्ये चिंतेचं वातावरण आहे. डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यूकेमध्ये सोमवारी तब्बल 41 हजार 385 नवे कोरोनाग्रस्त आढळले. यूकेमध्ये पहिल्यांदाच एका दिवसातील कोरोना रुग्णसंख्येने 40 हजारांचा टप्पा पार केला. (New COVID Strain turns worst Corona pandemic wave for UK)

यूकेने आतापर्यंत कोरोनाच्या दोन लाटा पाहिल्या आहेत. पहिली लाट एप्रिल-मे महिन्यात आली होती. जेव्हा संपूर्ण जगच कोव्हिडच्या छायेखाली होतं. तर ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातही यूकेमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. नोव्हेंबर महिन्यातील कोरोनालाट आधीपेक्षा घातक होती. त्यावेळी दररोज 20 हजारापेक्षा अधिक कोरोनाग्रस्त सापडत होते. त्या धक्क्यातून जरा कुठे सावरत असतानाच कोरोनाच्या नव्या अवताराने यूकेचं धाबं दणाणलं आहे.

यूकेमध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढली असली, तरी आतापर्यंत 24 तासांच्या कालावधीत देशात 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले नव्हते. सोमवारच्या दिवशी तब्बल 41 हजार 385 नवे कोरोनाग्रस्त आढळल्याने प्रशासनही हादरलं आहे.

सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला होता. मात्र नव्या कोरोना अवताराचा प्रसार लंडन आण इसेक्समध्ये वेगाने होत आहे, हे नोव्हेंबरमध्ये शास्त्रज्ञांनी शोधलं. 11 डिसेंबरला यूके सरकारला नवा स्ट्रेन आणि त्याची वाढलेल्या प्रसारक्षमतेबद्दल माहिती मिळाली. या अवताराची प्रसार क्षमता 70 टक्के अधिक असल्याचं समोर आलं आहे.

एकही रुग्ण नव्या कोरोनाने बाधित नाही

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कुठेही नवा कोरोनाचा अवतार आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. पण तरीही आवश्यक ती काळजी घेणं महत्त्वाचं असून रुग्णाचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला असेल तर तुम्ही जाब विचारू शकता असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?

कोरोनाच्या नव्या घातक अवताराची भारतात एन्ट्री, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित

(New COVID Strain turns worst Corona pandemic wave for UK)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI