डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला सारले बाजूला? नवीन धोरणामुळे अडचणी वाढण्याची शक्यता, थेट..

डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून जगाला धक्का देणारी निर्णय घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. यादरम्यान भारताने अमेरिकेच्या टॅरिफमधून थेट मार्ग काढत होणारे नुकसान पूर्णपणे टाळले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला सारले बाजूला? नवीन धोरणामुळे अडचणी वाढण्याची शक्यता, थेट..
Donald Trump
| Updated on: Dec 17, 2025 | 9:41 AM

अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लादला आहे. भारतावर टॅरिफ लावताना अमेरिकेने रशियाच्या तेलाचे कारण दिले. मात्र, रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या चीनवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त टॅरिफ त्यांनी लादला नाही. भारत पाकिस्तान युद्धावेळी वारंवार डोनाल्ड ट्रम्प दावा करताना दिसले की, मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवले. मात्र, यावर भारताने स्पष्ट भूमिका मांडत डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा असल्याचे त्यांनी म्हटले. भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दोन्ही देशातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर रोखले आणि शांतता करार केला. डोनाल्ड ट्रम्प त्यावेळी नोबेल पुरस्कारासाठी दावा करत होते. जगातील मोठे सात युद्ध रोखल्याचा त्यांच्याकडून दावा केला जात होता. त्यामध्ये भारत पाकिस्तान युद्धाचाही समावेश होता. भारताने डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा खोटा असल्याचे म्हटल्यापासून ते भारताविरोधात भूमिका घेत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांची भारतासोबतची भूमिका बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रचार करण्यासाठीही अमेरिकेत गेले होते. अमेरिकेतील भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदानही मोठ्या प्रमाणात केले. मात्र, भारतीयांना अडचणीत आणण्यासाठी त्यांच्याकडून H-1B व्हिसाच्या नियमातही मोठा बदल करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीला भारत आणि अमेरिकेत व्यापार करार सुरू आहेत. तशी चर्चा सुरू असून अजून करार झाली नाहीत.

अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय कृषी मार्केट हवे आहे. भारत हा शेती प्रधान देश असल्याने आपल्या शेतकऱ्यांचे नुकसान अमेरिकेच्या उत्पादनाने होणार नाही, याची काळजी भारताकडून घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, भारत आणि अमेरिकेतील व्यापार चर्चा अंतिम टप्प्यात आहे. ही परिस्थिती भारतासाठी आव्हानात्मक आहे.

व्यापार, संरक्षण खरेदी आणि सामरिक स्वायत्तता यांसारख्या मुद्द्यांवर अमेरिकेचा दबाव वाढू शकतो. स्थलांतर धोरणातही असे संकेत मिळत आहेत की भारतीय कुशल व्यावसायिकांसाठीच्या संधी मर्यादित होण्याची शक्यता आहे. भारत यातून मार्ग काढताना दिसत आहे. उलट अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारत आणि चीनमधील संबंध सुधारली असून भारत आणि चीनमधील व्यापार वाढला आहे.