Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याची घोषणा

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या भारत दौऱ्याची घोषणा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प परस्परांचे चांगले मित्र आहेत, असं सतत अमेरिकेकडून सांगितलं जातं.

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुप्रतिक्षित भारत दौऱ्याची घोषणा
Trump-Modi
| Updated on: Jun 27, 2026 | 11:44 AM

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. “मी स्वत: या ऐतिहासिक VVIP दौऱ्याच्या तयारीला अंतिम रुप देण्यासाठी आणि दोन्ही देशांमध्ये बहुप्रतीक्षित ट्रेड डील (व्यापार करार) लवकरात लवकर फायनल करण्यासाठी भारतात येत आहे” असं मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिकेतील रणनितीक, व्यापारी संबंधांचा एक नवीन अध्याय सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे खासगी संबंध हे दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा पाया आहे असं रुबिया या दौऱ्याबद्दल म्हणाले. “दोन्ही नेते एकसारखाच विचार करतात. मी स्वत: पीएम मोदी यांचा मोठा प्रशंसक आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली भारत एक जागतिक शक्ती म्हणून उदयाला आला आहे” असं मार्को रुबियो म्हणाले.

भारत आणि अमेरिकेत ट्रेड डील लवकरच फायनल होणार आहे असं सुद्धा मार्को रुबियो म्हणाले. कच्चा तेलावर रिफाइन करण्याची क्षमता असलेल्या निवडक देशांमध्ये भारताचा समावेश होतो असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर सुद्धा या प्रसंगी व्यक्त झाले. “भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार कराराच्या जवळ आहेत. आता फक्त काही मुद्दे उरले आहेत. पीएम मोदी आणि राष्ट्रपती ट्रम्प यांचे व्यक्तिगत संबंध भारत-अमेरिका संबंधांचा पाया आहे” असं सर्जियो गोर म्हणाले.

ट्रम्प मागच्यावेळी भारत दौऱ्यावर कधी आलेले?

ट्रम्प मागच्यावेळी फेब्रुवारी 2020 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. अहमदाबामध्ये नमस्त ट्रम्प कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह सहभागी झाले होते. ट्रम्प आणि पीएम मोदी सतत संपर्कात आहेत. अलीकडेच दोन्ही नेते फ्रान्समध्ये G-7 समीटमध्ये भेटले होते. भारत आणि अमेरिकेत लवकरच ट्रेड डील होईल असं ट्रम्प यावेळी म्हणाले होते. मागच्यावर्षी ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला. त्यानंतर दोन्ही देशांच्या संबंधात तणाव निर्माण झालेला. आता भारत आणि अमेरिकेचे संबंध थोडे सामान्य झाले आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us