दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबद्दल खळबळजनक माहिती एनआयएच्या हाती, थेट तुर्कीमध्ये जाऊन…

Delhi Bomb Blast : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाने संपूर्ण देश हादरला. आता अत्यंत हैराण करणारी आणि खळबळ उडवणारी माहिती पुढे आली. थेट तुर्कीमध्ये जाऊन उमर कोणाला भेटला हे पुढे आलंय.

दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबद्दल खळबळजनक माहिती एनआयएच्या हाती, थेट तुर्कीमध्ये जाऊन...
Delhi Bomb Blast
| Updated on: Nov 21, 2025 | 1:47 PM

दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात 10 नोव्हेंबरच्या सायंकाळी मोठा स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. या स्फोटाचे कनेक्शन थेट तुर्कीपर्यंत जाऊन पोहोचले. जैशने या हल्ल्यासाठी पैसा दिला होता आणि सर्वकाही प्लॅनिंग तयार केले होते. हैराण करणारे म्हणजे यावेळी त्यांना स्फोटामध्ये चक्क डॉक्टरांचा वापर केला. 20 लाख रूपये पाठवण्यात आली. लाल किल्ल्याजवळ घाई गडबडीत स्फोट झाला. मोठा घातपात करण्याचा कट होता. डॉ. उमर हा ज्यावेळी स्फोट झाला, त्यावेळी गाडीत होता. हेच नाही तर दिल्लीच्या रस्त्यांवर ही गाडी तब्बल 11 तास फिरत होती. दिल्लीतील नामांकित विद्यापीठात काही काळ गाडी होती. दिल्ली बॉम्बस्फोटाबद्दल तपास जसा जसा पुढे जात आहे, तशी हैराण करणारी माहिती पुढे येत आहे.

या स्फोटाचा सूत्रधार डॉ. उमर 2022 मध्ये तुर्कीमध्ये एका सीरियन दहशतवाद्याशी भेटला होता, अशी धक्कादायक माहिती तपासात मिळाली. डॉ. मुझम्मिल शकील गनई आणि डॉ. मुझफ्फर रायदर हे देखील त्यावेळी उपस्थित होते. हे तिघेही त्यांच्या पाकिस्तानी हँडलर उकाशाच्या सांगण्यावरून सीरियन दहशतवाद्याला भेटले. सतत ते त्यांच्या संपर्कात होते. एनआयएने गुरुवारी डॉ. मुझम्मिल आणि इतर तीन आरोपींना अटक केली आहे, ज्यांच्या माध्यमातून स्फोट प्रकरणातील आंतरराष्ट्रीय कटाचे कनेक्शन पुढे आले.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. उमर, डॉ. मुझफ्फर आणि डॉ. मुझम्मिल तुर्की येथे तब्बल 20 दिवस राहिले. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर राहणाऱ्या त्यांच्या पाकिस्तानी हँडलर उकाशाला भेटण्यासाठी गेले होते. मुझफ्फर युएई मार्गे अफगाणिस्तानात पळून गेला आणि थेट अल कायदामध्ये सहभागी झाला. डॉ. उमरला तुर्की मार्गे अफगाणिस्तानात जाण्याऐवजी भारतात परत पाठवण्यात आले. जैशकडून त्याला भारतात हल्ला घडवण्यासाठी पाठवण्यात आले.

नियोजनानुसार, कोणालाही शंका येऊ नये आणि कटही रचता येईल अजून काही लोकांना कटात सहभागी करता येईल. याकरिता डॉ. उमरने अल फलाह विद्यापाठीत नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्याने एक मॉडेल तयार केले. जे मोठ्या हल्ल्यांची तयारी करत होते. दिल्ली बॉम्बस्फोटातील i-20 कार खरेदी करण्यासाठी अमीर रशीद अली आणि दुसरा आरोपी जसीर बिलाल वाणी यांना एनआयएने अटक केली. त्यांना या कटाची कल्पना होती.