AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना धडे विमाने, ना प्रवासी, ना सुविधा,पाकिस्तानचा हा एअरपोर्ट एक रहस्य का बनलाय ?

पाकिस्तानातील जातीय गट बलुच या अल्पसंख्यांक गटाचे म्हणणे आहे पाक सरकार त्यांना भेदभावपर्वक वागणूक देत आहे. त्यांना नोकऱ्यांपासून दूर ठेवले जात आहे. पाक सरकारने या आरोपांचे खंडन केले आहे.

ना धडे विमाने, ना प्रवासी, ना सुविधा,पाकिस्तानचा हा एअरपोर्ट एक रहस्य का बनलाय ?
No planes, no passengers, no facilities, why has Pakistan's Gwadar Airport become a mystery?
| Updated on: Feb 24, 2025 | 5:07 PM
Share

Pakistan Gwader New Airport : ग्वादर बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर शहराच्या जवळ वसले आहे. हे बंदर अरबी समुद्राकाठी वसलेले असून पाकिस्तानने ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे मोठ्या थाटात उद्घाटन केले होते. पाकिस्तानचा सर्वात नवा आणि महागडा हा विमानतळ आता एक रहस्य बनलेला आहे. येथे कोणतेही विमान नाही कि कोणता प्रवासी नाही.चीनच्या मदतीने या विमानतळाच्या निर्मितीसाठी २४ कोटी अमेरिकन डॉलर खर्च झाले होते. आता हे विमानतळ सर्वसामान्य जनतेसाठी कधी उघडणार हे कळण्या पलिकडे असल्याचे म्हटले जात आहे.

गेल्यावर्षी ऑक्टोबर २०२४ रोजी या विमानतळाची निर्मिती झाली होती. गरीब आणि अशांत दक्षिण-पश्चिमी बलूचिस्तान प्रांतात हा विमानतळ उभारलेला आहे. गेल्या एक दशकाहून अधिक काळ चीन – पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) अंतर्गत बलुचिस्तान आणि ग्वादर दरम्यान अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे.

हा प्रकल्प चीनच्या प.शिनजियांग प्रांताला अरबी समुद्राशी जोडला जाणार आहे. पाकिस्तान आणि चीन दोन्ही अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला महत्वाकांक्षी बदल करणार प्रकल्प म्हटले होते. परंतू ग्वादर मध्ये काहीही बदल झालेला नाही. शहर राष्ट्रीय ग्रिडशी जोडले गेलेले नाही. आणि येथे वीज पुरवठा शेजारील इराण वा सौर ऊर्जाप्रकल्पाद्वारे येते. आणि पिण्याचे पाण्याची येथे टंचाई आहे.

शहरातील लोकांसाठी नाही

शहराच्या ९० हजार लोकांना या चार लाख प्रवासी क्षमतेच्या एअरपोर्टची गरज नाही. हा एअरपोर्ट पाक वा ग्वादर येथील नागरिकांसाठी नाही तर चीनसाठी असल्याचा दावा चीन आणि पाकिस्तान संबधांचे जाणकार अझीम खालीद यांनी केला आहे. म्हणजे आपल्या लोकांना ग्वादर आणि बलुचिस्तानपर्यंत सुरक्षित पोहचविण्यासाठी चीनने हा अक्राळ विक्राळ विमानतळ उभारला आहे.

रणनितीच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या आणि सर्व नैसर्गिक साधन सामुग्रीने संपन्न असलेल्या बलुचिस्तानात दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम चीनची तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी चायना पेट्रोलियम इंजिनिअरिंग एण्ड कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन करीत China Petroleum Engineering and Construction Corporation (CPECC) आहे.या योजनेच्या आतापर्यंत अनेक निदर्शने झाली आहेत. दहशतवादी पाकिस्तानी सैनिकांनी आणि चीनी सैनिकांना लक्ष्य करीत आले आहेत.

नैसर्गिक सौदर्य तरी खतरनाक

जेथे हा विमानतळ उभारण्यात आला आहे हा प्रदेश खपूच सुंदर आहे. परंतू येथे प्रवास करणे जीवासाठी अत्यंत धोकादायक आहे आणि जीवघातक आहे. ग्वादरचा डोमेस्टीक एअरपोर्ट विमानतळावरुन एका धावपट्टीवरुन विमानाचे उड्डाण केले जाते. कराचीसाठी आठवड्यातून तीन वेळा फ्लाईटचे उड्डाण केले जाते. ग्वादरमधील एकाही रहिवाशाला या विमानतळावर नोकरी मिळालेली नाही. येथील कोणत्याही व्यक्तीला चौकीदार म्हणूनही देखील नोकरीवर ठेवलेले नाही असा आरोप बलूचिस्तान अवामी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अब्दुल गफूर होथ यांनी म्हटले आहे.

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?