मोठी बातमी ! किम जोंग उन संतापले, या देशाला दिला थेट इशारा, नेमकं कारण काय?

North Korea vs Japan : किंम जोंग उन हे आपल्या एका शेजारील देशावर भडकले आहेत. उत्तर कोरियाने जपानला गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

मोठी बातमी ! किम जोंग उन संतापले, या देशाला दिला थेट इशारा, नेमकं कारण काय?
kim jong un
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 21, 2025 | 11:05 PM

उत्तर कोरियात किम जोंग उन यांची हुकुमशाही सत्ता आहे. या देशातील विचित्र कायद्यांबद्दल आणि बंधनांबद्दल तुम्ही नक्कीच माहिती ऐकली असेल. किम जोंग हे रागाच्या भरात मृत्यूदंडाचीही शिक्षा द्यायला मागे पुढे पाहत नाहीत हे तुम्ही ऐकले असेल. अशातच आता किंम जोंग उन हे आपल्या एका शेजारील देशावर भडकले आहेत. उत्तर कोरियाने जपानला गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जपानचे अण्वस्त्रे तयार करण्याचे भाष्य

समोर आलेल्या माहितीनुसार, जपानच्या पंतप्रधान कार्यालयातील एका अधिकाऱ्याने क्योडो न्यूजला सांगितले की, “मला वाटते की आपल्याकडे अण्वस्त्रे असली पाहिजेत.” हा अधिकारी जपानचे सुरक्षा धोरण तयार करण्यात सहभागी होता. यावर उत्तर कोरियाने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे, जपानने अण्वस्त्रे विकसित विकसित केल्यास आशियामध्ये अण्वस्त्र आपत्तीचा धोका वाढेल त्यामुळे ही बाब तात्काळ थांबवली पाहिजे असा इशारा कोरियाने दिला आहे.

किम जोंग उन यांचा विरोध

उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले की, जपानच्या या विधानांवरून असे दिसून येते की जपान उघडपणे अण्वस्त्रे बाळगण्याची आपली महत्त्वाकांक्षा व्यक्त करत आहे, यामुळे मर्यादा ओलांडली जात आहे. जपान अण्वस्त्रे तयार करण्यासाठी करत असलेला प्रयत्न तात्काळ थांबवला पाहिजे. असे न झाल्यास मानवतेवर मोठी आपत्ती ओढवेल.

उत्तर कोरियाच्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जपानी अधिकाऱ्याकडून आलेले हे विधान खोटे नाही, हे जपानच्या अणुशस्त्रे विकसित करण्याच्या दीर्घकाळापासूनच्या महत्त्वाकांक्षेचे स्पष्ट प्रतिबिंब आहे. जर जपानने अणुशस्त्रे तयार केली तर आशियाई देशांना भयानक अणु आपत्तीचा सामना करावा लागेल, ज्यामुळे मानवजातीला मोठ्या आपत्तीचा सामना करावा लागेल. त्यामुळे याला रोखले पाहिजे.

कोरियाकडे आहेत अण्वस्त्रे

दरम्यान, उत्तर कोरियाने स्वतःच्या अणुकार्यक्रमाचा उल्लेख केला नाही, कोरियाने 2006 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या नियमांचे उल्लंघन करून केलेली पहिली अणुचाचणी केली होती. उत्तर कोरियाकडे डझनभर अणुशस्त्रे असल्याची माहिती आहे. कोरियाने आंतरराष्ट्रीय निर्बंधांना न जुमानता ती तयार केली आहेत. अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून असणाऱ्या लष्करी संकटाला रोखण्यासाठी कोरियाने ही शस्त्रे विकसित केली आहेत.