Kim Jong Un : परदेशी टीव्ही शो पाहिला तर थेट मृत्युदंड! किम जोंग उनचं हादरवून टाकरणारं सत्य

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन कधी काय करेल काही सांगता येत नाही. त्याच्या देशात परदेशी टीव्ही शो पाहिल्यावर थेट मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Kim Jong Un : परदेशी टीव्ही शो पाहिला तर थेट मृत्युदंड! किम जोंग उनचं हादरवून टाकरणारं सत्य
north korea and kim jong un
| Updated on: Sep 14, 2025 | 5:36 PM

Kim Jong Un : उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग ऊन नेहमीच चर्चेत असतो. त्याने याआधी संपूर्ण जगाला थक्क करणारे काही निर्णय घेतलेले आहेत. विशेष म्हणजे शस्त्रनिर्मितीवर त्याच विशेष भर असतो. त्यामुळेच हा देश कधी काय करेल? याचा धसका जगाने घेतल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, आता याच किम जोंग उन याचा एक नवा कारमाना समोर आला आहे. त्याने उत्तर कोरियाच्या लोकांसाठी अनेक जाचक नियम तयार केलेले आहेत. यातल्याच एका नियमानुसार विदेश टीव्ही शो पाहिल्यावर थेट मृत्युदंड दिला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

परदेशी टीव्ही शो पाहिला की थेट मृत्युदंड

युनायटेन नेशन्सचा मानवाधिकाराचा एक रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टनुार उत्तर कोरियात परदेशी टीव्ही शो पाहिल्यावर थेट मृत्युदंड दिला जातो, असे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे उत्तर कोरियात दक्षिण कोरियातील टीव्ही शोंवर बंदी आहे. त्यामुळे या देशातील कोणताही टीव्ही शो पाहिला की तिथे थेट मृत्युदंड ठोठावला जातो. परदेशी शो शेअरजरी केला तरी तिथे मृत्युदंदाडाची शिक्षा आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्राच्या या रिपोर्टनुसार 2014 सालानंतर उत्तर कोरियातील परिस्थिती जास्तच बिघडलेली आहे. कोरोना महासाथीनंतर गुन्हेगारांना मृत्यू होईपर्यंत फासावर लटकावण्याच्या प्रमाणाताही वाढ झाल्याचे समोर आले आहे.

लोकांवरील पाळत वाढली

संयुक्त राष्ट्रांच्या या रिपोर्टनुसार गेल्या दहा वर्षांत उत्तर कोरियातील परिस्थिती जास्तच बिकट झालेली आहे. इथे मानवाधिकारात सुधारणा झालेली नाही. किम जोंग उन याचे लोकांवरील नियमंत्रण आणि लोकांवरील पाळत वाढली आहे. तिथे नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाते. तिथल्या नागरिकांना सरकारच्या विरोधात बोलण्यास परवानगी नाही.

लोकांच्या भावना चिरडता याव्यात म्हणून…

उत्तर कोरियातून पळून आलेल्या एका नागरिकाने सांगितल्यानुसार तिथल्या लोकांनी डोळे आणि कान बंद ठेवावेत यासाठी नियम आणखी कडक करण्यात आले आहेत. लोकांमध्ये असंतोष किंवा तक्रार असेल तर ती तिथेच चिरडता यावी यासाठी पाळत ठेवली जात आहे, असे या उत्तर कोरियातून पळून आलेल्या व्यक्तीने सांगितले आहे. या सर्व बंधनांमुळे उत्तर कोरियातील लोकांना जगणे अवघड होऊन बसले आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालात उत्तर कोरियाला थेट बंद देश असे म्हणण्यात आले आहे.