एका झटक्यात 85 हजार लोकांचा खात्मा, किम जोंग उन बनवतोय जगाची झोप उडवणारं शस्त्र!

उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन हे एका संहारक शस्त्राची निर्मिती करत आहेत. या शस्त्रामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे.

एका झटक्यात 85 हजार लोकांचा खात्मा, किम जोंग उन बनवतोय जगाची झोप उडवणारं शस्त्र!
kim jong un
| Updated on: Jul 16, 2025 | 8:27 PM

Kim Jong Un : जागतिक पातळीवरील राजकारण आणि वेगवेगळ्या देशांत चालू असलेले युद्ध लक्षात घेता उत्तर कोरियाने शस्त्रांचे उत्पादन वाढवले आहे. युद्धाची बदलेली नीति आणि तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता या देशाकडून एका विध्वंसक अशा रासायनिक शास्त्राची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे हे शस्त्र एवढे भयंकर असेल की त्याच्या वापरामुळे एकाच वेळी हजारो लोकांचा मृ्त्यू होण्याची शक्यता आहे.

पहिल्या महायुद्धात नेमकं काय घडलं होतं?

पहिल्या विश्वयुद्धात क्लोरीन, फॉस्जीन आणि मस्टर्ड गॅसमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. या रसायनांचा अगोदर जर्मनीने वापर केला होता. यप्रेस आणि बेल्जियम या भागांवर तोफा डागून जर्मनीने तिथे क्लोरीन वायू सोडून दिला होता. फ्रान्स तसेच अल्जेरियाच्या सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता.

रासायनिक शस्त्र किती संहारक?

अशाच प्रकारचे शस्त्र उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्या आदेशानंतर निर्माण केले जात आहे. रासायनिक शस्त्र भविष्यकाळात फारच विघातक ठरणार आहेत. त्याची प्रचिती ही पहिल्या विश्वयुद्धात आली होती. OPCW म्हणजेच ऑर्गनायझेशन फॉर प्रोबिशन ऑफ केमिकल वेप्नसच्या म्हणण्यांनुसार रासायनिक शस्त्रांच्या वापरामुळे पहिल्या महायुद्धात साधारण 85 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता किम जोन उंग यांच्या आदेशानंतर उत्तर कोरियाचे रासायनिक शस्त्र किती संहारक असेल याची कल्पना केली जात आहे.

उत्तर कोरिया नेमकं काय करू पाहतंय?

मिळालेल्या माहितीनुसार उत्तर कोरिया आतापर्यंतचे सर्वाधिक संहारक रासायनिक शस्त्र तयार करत आहे. उत्तर कोरियातील डेली एनके या माध्यम संस्थेने प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टमध्ये याबाबत विस्तर माहिती देण्यात आली आहे. याच वृत्तानुसार उत्तर कोरिया या शस्त्राच्या मदतीने सर्वात अगोदर दक्षिण कोरियालाच लक्ष्य करण्याची शक्यता आहे. 1950 सालापासून या दोन्ही देशांत तणाव आहे. अनेकवेळा किम जोंग उन यांनी दक्षिण कोरियाला नेस्तनाबूत करण्याचाही इशारा दिलेला आहे. अण्वस्त्रांचा वापर करण्याऐवजी थेट रासायनिक शस्त्रांचाच वापर करावा, असा उत्तर कोरियाचा कल आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? किम जोंग उन यांचे हे शस्त्र नेमके कसे असेल? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.