AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : रशिया, चीन नव्हे तर इराण यांच्या बळावर इस्रायलला देतोय आव्हान, पाहा कोण आहेत ते

इस्रायलने हेजबोला संघटनेचा प्रमुख हसन नसरुल्लाह याची हत्या केल्यानंतर इराणने इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव करुन युद्धाला तोंड फोडले आहे. त्यामुळे आता तेल संपन्न इराणवर इस्रायल मोठा हल्ला करणार की काय याची कुणकुण लागून राहीली असून इस्रायलचं पुढचं पाऊल काय असणार ? याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागले आहे.

Iran Israel War : रशिया, चीन नव्हे तर इराण यांच्या बळावर इस्रायलला देतोय आव्हान, पाहा कोण आहेत ते
israel and iran war
| Updated on: Oct 05, 2024 | 10:23 PM
Share

हेजबोलाचा प्रमुख हसन नसरुल्लाह याचा खात्मा इस्रायलने केल्यानंतर चवताळलेल्या इराणने इस्रायलवर एकापाठोपाठ 200 क्षेपणास्रे डागल्याने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी देखील प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला खामेनेई यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करीत भविष्यात इस्रायलवर पु्न्हा जशाच जसे उत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या पाठीशी अमेरिका असताना इराणने हे धाडस कसे काय केले याचे जगाला कोडे पडले आहे.

इस्रायलवर इराण दोनशे क्षेपणास्र डागून खुले चॅलेंज दिले आहे. त्यानंतर या दोन्ही देशात युद्ध भडकणार असल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्यापूर्वी इराणने रशियाची पूर्व परवानगी घेतल्याचे म्हटले जात आहे. रशियाच्या या निर्णयाने इस्रायलला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. परंतू आता मध्य पूर्वेत युद्ध भडकणार असल्याचे म्हटले जात आहे. जगाची नजर आता इस्रायल काय करणार याकडे लागली आहे. अशात इस्रायल इराण विरोधात कमजोर पडला की काय अशी शंका घेतली जात आहे. तसेच इराण एवढी ताकद कशी आली याची देखील चर्चा सुरु आहे. अखेर कोणाच्या बळावर इराणने इतके मोठे पाऊल उचलले याची देखील चर्चा सुरु आहे.

इराणकडे मिसाईलचा खजाना

इराणला अनेक अरब देशाचे समर्थन आहे. खास करुन लेबनॉन आणि कुवैत हे ते देश आहेत.हे देश इराण सोबत उभे असून वेळ प्रसंगी युद्धात देखील इराणच्या बाजूने उतरु शकतात असे म्हटले जात आहे. तसेच इराणकडे मोठे शस्र भंडार आहे. इराण जवळ आधुनिक क्षेपणास्रे आणि शस्रास्रं आहेत. ज्यात अबू महदी मिसाईल, फतह हायपरसॉनिक बॅलिस्टीक मिसाईल, मुहाजिर – 10 ड्रोन ही क्षेपणास्र इस्रायलच्या साठी मोठी आव्हान ठरु शकतात. इराणच्या सर्वात खतरनाक मिसाईल पैकी एक खुर्ज (Khorramshahr) ही मानली जात आहे. त्यामुळे इस्रायलला दोन हात करताना विचारपूर्वक पाऊले उचलावी लागत आहेत.

Follow Us
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
नाशिकमधील जीवघेण्या खड्ड्यांमुळे ठाकरे सेनेचा महापालिकेवर भव्य मोर्चा
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी..
चाळणी झालेल्या रस्त्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन; नाशिककरांसाठी संजय राऊत मैदानात, पहा व्हिडीओ
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत
ज्याची भीती तेच... महाराष्ट्रातदेखील बिहार सारखं होणार, SIR बाबत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
मराठा आरक्षण आंदोलन: मनोज जरांगेंची ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रांची मागणी, सत्ता जाण्याची शक्यता
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले,
तुमचं सरकार पाडणार, मराठ्यांचा तळतळाट... मनोज जरांगे काडाडले, पुर्ण 58 लाख...
रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
रस्त्याच्या दुरावस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या मुली राज ठाकरेंच्या भेटीला
देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष