चीननंतर आता नेपाळची आगळीक, 100 रुपयांच्या नोटेवर असेही दाखवले की भारत सरकार संतापले…

नेपाळच्या राष्ट्र बँकेने शंभर रुपयांची नवीन नोट जारी केली आहे. यातील सुधारित नकाशात असे काही दाखवले आहे की त्यामुळे भारत सरकारने आक्षेप नोंदवला आहे.

चीननंतर आता नेपाळची आगळीक, 100 रुपयांच्या नोटेवर असेही दाखवले की भारत सरकार संतापले...
Nepal New Note
| Updated on: Nov 27, 2025 | 9:46 PM

चीनने आपल्या अरुणाचल प्रदेशावरील केलेला दावा चर्चेत असताना आता नेपाळी त्यावर कडी केली आहे. नेपाळची केंद्रीय बँक नेपाळ राष्ट्रीय बँकेने (NRB) गुरुवारी १०० रुपयांची नवीन नोट जारी केली आहे. या नोटेवर नेपाळचा सुधारित नकाशा छापण्यात आला आहे. यात कालापाणी, लिपुलेख आणि लिम्पियाधुरा या भागाला नेपाळचा हिस्सा दाखवण्यात आल्याने नवा वादाला निमंत्रण मिळाले आहे. भारताच्या या भागांना आपला भाग दाखवल्याने भारताने आक्षेप घेतला आहे.

या नव्या नोटेवर माजी गर्व्हनर महाप्रसाद अधिकारी यांच्या सह्या दिसत आहेत. नोट जारी करण्याची तारीख २०८१ विक्रम संवत ( साल २०२४ ) लिहीली आहे.मे २०२० मध्ये तत्कालिन पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सरकारने राजकीय नकाशा जाहीर केला होता. त्यात तीन वादग्रस्त क्षेत्रांना नेपाळच्या सीमेत दाखवले होते. नंतर नेपाळच्या संसदेने देखील या नकाशाला मंजूरी दिली होती.

भारताने देखील आधीच विरोध केला होता

त्यावेळी नेपाळच्या या पावलाला एकतर्फी निर्णय म्हणत भारताने त्याचा कठोर विरोध केला होता. भारताने म्हटले होते की नकाशाचा अशा प्रकारे वाढवून विस्तार करणे स्वीकार केले जाऊ शकत नाही. भारताने ही तिन्ही क्षेत्रे आपली असल्याचे म्हटले होते. आधीच चीनने अरुणाचलावर दावा केला असताना आता नेपाळ देखील त्याच वाटेवर जात आहे.

नेपाळच्या राष्ट्र बँकेच्या प्रवक्त्यांच्या मते जुन्या १०० रुपयांच्या नोटेवर देखील नेपाळचा नकाशा होता. परंतू सरकारच्या निर्णयानंतर त्याला सुधारित करुन नवीन नोट तयार केली आहे. त्यांनी सांगितले की १०,५०,५०० आणि १००० रुपयांच्या नोटांवर नकाशा नसतो. केवळ १०० रुपयांच्या नोटेवरटच नेपाळचा नकाशा छापला जात असतो.

नव्या नोटेचे डिझाईन कसे आहे ?

नवीन नोटेच्या डिझाईनमध्ये अनेक एलिमेंटना सामील केले आहे. नोटेच्या डाव्या बाजूला माऊंट एव्हरेस्टचा फोटो आहे.उजव्या बाजूला नेपाळचे राष्ट्रीय फूल लाल गुरांस (Rhododendron) याची वॉटरमार्क छबि दिसत आहे. नोटेच्या मध्ये हलका हिरव्या रंगाचा नेपाळचा नकाशा दिसत आहे. नकाशा जवळ अशोक स्तंभ आणि लुम्बिनी लिहीलेले आहे.
नोटेच्या मागच्या बाजूला एक सिंग असलेल्या गेंड्याचा फोटो आहे. तसेच सुरक्षेसाठी यात सिक्योरिटी थ्रेड आणि उठावदार काळा बिंदू आहे. म्हणजे दृष्टीहीन लोकांनाही नोट नीट ओळखता यावी अशी सोय केली आहे.

नेपाळची भारतासोबत सुमारे १८५० किमी लांबीची सामायिक सीमा आहे. जी सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडातून जोडलेली आहे. १०० नेपाळी रुपयाची किंमत भारतात सुमारे ६२.५६ रुपये होते.