US-Iran Situation Update : आमच्याकडे टार्गेटची लिस्ट तयार, तुम्ही फक्त..सुपरपावर अमेरिकेला इराणचं ओपन चॅलेंज

US-Iran Situation Update : सध्या अमेरिका-इराण युद्ध थांबलं असलं तरी तणाव कायम आहे. कुठल्याही क्षणी मोठा भडका उडेल अशी स्थिती आहे. इराणने आता अमेरिकेला जशास तसं उत्तर देण्याची भाषा केली आहे. पाकिस्तानची मध्यस्थी काही कामाची नसल्याचं सिद्ध झालं आहे.

US-Iran Situation Update : आमच्याकडे टार्गेटची लिस्ट तयार, तुम्ही फक्त..सुपरपावर अमेरिकेला इराणचं ओपन चॅलेंज
Donald Trump
| Updated on: Apr 24, 2026 | 2:17 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या विनंतीवरुन सीजफायरचा कालावधी वाढवला आहे. अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण युद्धात सीजफायर होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस झालेत. पण दोन्ही बाजूंमध्ये अजून पर्यंत कुठलीही सकारात्मक चर्चा झालेली नाही. फक्त परस्परांना धमक्या देण्याचं काम सुरु आहे. अमेरिका-इराण दोघांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुजची कोंडी करुन ठेवली आहे. त्यामुळे तिथून होणारी तेल वाहतूक जवळपास ठप्पच आहे. सीजफायर झाल्यानंतर सकारात्मक चर्चा झाली असती, तर तणाव निवळला असता. पण दोन्ही बाजू झुकायला तयार नाहीत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने त्यांचं सर्वधन केलेलं युरोनियम आमच्या ताब्यात द्यावं अशी अट घातली आहे. पण इराण त्यांचं ऐकायला अजिबात तयार नाही.

काहीही झालं तरी इराणला अणवस्त्र संपन्न देश बनू देणार नाही हा ट्रम्प यांचा संकल्प आहे. पण इराण अणवस्त्र विकासापासून मागे हटायला तयार नाही. त्यामुळे सीजफायर असला तरी प्रचंड तणाव आहे. पाकिस्तानची मध्यस्थी काही उपयोगाची नसल्याच सिद्ध झालं आहे. ते फक्त ट्रम्प यांचे संदेशवाहक एवढीच त्यांची भूमिका आहे. एक चुकीच पाऊल आणि सगळ्या मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडेल अशी स्थिती आहे. सध्या ट्रम्प यांनी हॉर्मुज स्ट्रेटची नाकेबंदी करुन ठेवली आहे. इराणच्या बंदरावर जाणाऱ्या आणि तिथून बाहेर येणाऱ्या जहाजांचा मार्ग रोखून धरला आहे. इराणची आर्थिक नाकेबंदी करण्याची ही स्ट्रेटर्जी आहे.

तुम्ही हल्ला केलात तर आमचा हल्ला त्यापेक्षा भयानक

त्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकी नौदलाल हॉर्मुज स्ट्रेटमध्ये समुद्री सुरुंग पेरायला येणारी इराणची जहाजं, बोटी उडवून देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तणाव टिपेला पोहोचला आहे. चर्चेसाठी सुरु असलेले प्रयत्नही यशस्वी होत नाहीयत. आता इराणने धमकी दिली आहे. त्यांनी सौदी अरेबियाच्या तेल प्रकल्पांवर हल्ले करण्याची धमकी दिली आहे. आमच्या तेल प्रकल्पांवर हल्ले झाले तर प्रत्युत्तर म्हणून आम्ही सौदी अरेबियाच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करु असं इराणी अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “आमची टार्गेटची लिस्ट क्लियर आहे. आमच्या कुठल्या तेल विहिरींवर हल्ला झाला, तर आम्ही सौदीच्या तेल प्रकल्पांना लक्ष्य करु” असं इराणचे उप राष्ट्राध्यक्ष इस्माइल सकब इस्फाहानी म्हणाले. तुम्ही हल्ला केलात तर आमचा हल्ला त्यापेक्षा भयानक असेल असं ते म्हणाले.

 

 

Follow Us