India vs Pakistan : भारताबरोबर युद्धाच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात…

India vs Pakistan : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कालच भारताबरोबर युद्धासंबंधी एक वक्तव्य केलं होतं. आता त्यांनी आपल्या वक्तव्यावरुन पलटी मारली आहे. तणाव निर्माण झाल्याने पाकिस्तानी नेते पुरते गोंधळून गेले आहेत. भारताकडून कुठल्याही क्षणी हल्ला होईल, या भितीने पाकिस्तानी नेत्याना ग्रासून टाकलं आहे.

India vs Pakistan : भारताबरोबर युद्धाच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची पलटी, आता म्हणतात...
pakistan defence minister khawaja asif
Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: Apr 29, 2025 | 10:29 AM

भारताबरोबर तणाव निर्माण झाल्याने पाकिस्तानी नेते पुरते गोंधळून गेले आहेत. आपल्या वक्तव्यावरुन ते पलटी मारत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अलीकडेच भारताबरोबर युद्धासंबंधी एक वक्तव्य केलं होतं. आता यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी पलटी मारली आहे. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. ख्वाजा आसिफ यांनी एका आंतरराष्ट्रीय मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं की, ‘भारतासोबत युद्ध निश्चित आहे’. भारतासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, “मी उत्तर देताना म्हटलेलं की, सध्याच्या स्थितीत पुढचे दोन ते तीन दिवस महत्त्वपूर्ण आहेत. पुढच्या दोन-तीन दिवसात युद्ध होईल, हे मी म्हटलेलं नाही. पण मी हे जरुर म्हटलेलं की, स्थिती गंभीर आहे आणि युद्धाचा धोका आहे”

‘पाकिस्तानवर युद्ध लादलं गेलं, तर आम्ही याच कठोर प्रत्युत्तर’

“या क्षेत्राला मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. कारण पाकिस्तान-भारत सीमेच्या दोन्ही बाजूला सैन्य तैनात आहे. आम्ही युद्धासाठी मानसिक दृष्ट्या तयार आहोत. आमची तिन्ही सशस्त्र पथकं देशाच्या रक्षणासाठी तयार आहेत” असं ख्वाजा आसिफ म्हणाले. ‘पाकिस्तानवर युद्ध लादलं गेलं, तर आम्ही याच कठोर प्रत्युत्तर देऊ’ याचा ख्वाजा आसिफ यांनी पुनरुच्चार केला. त्यांनी इशारा देताना म्हटलं की, “आमच्याकडे सडेतोड प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे. आम्ही असं करण्यास अजिबात कचरणार नाही” ख्वाजा आसिफ यांच्या या वक्तव्यांमधून त्यांची युद्धाची खुमखुमीच दिसून येते.

कुटुंबांना देशाबाहेर पाठवलं

भारताकडून कुठल्याही क्षणी हल्ला होईल, या भितीने पाकिस्तानी नेत्याना ग्रासून टाकलं आहे. पाकिस्तानी नेते कुठलाही इंटरव्यू किंवा कार्यक्रमाला जातायत, तिथे त्यांना युद्धाबद्दल प्रश्न विचारले जात आहेत. युद्धाची भिती पाकिस्तानी जनतेमध्येच नाही, त्यांच्या नेत्यांमध्ये सुद्धा दिसून येत आहे. पाकिस्तानचे सैन्य प्रमुख आसिफ मुनीर आणि बिलावल भुट्टोसह अनेक नेते आणि अधिकाऱ्यांनी आपपाल्या कुटुंबांना देशाबाहेर पाठून दिलं आहे.