
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केला हे उघड झाले आहे. त्याचे भरभक्कम पुरावे सुद्धा भारताच्या तपास यंत्रणांच्या हाती लागले आहेत. दहशतवादी, दहशतवाद, धर्मवेड्यांना पोसणारे पाकडे सध्या जास्त वटवट करत आहेत. त्यांना युद्धाची खुमखुमी आहे. बिलावल भुट्टो, मरियमनंतर आता पाकिस्तानच्या या बिनडोक महिला खासदाराने अकलेचे तारे तोडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही सैन्य दलाला कारवाईची मुभा दिल्याने पाकड्यांचा तिळपापड झाला आहे. पाकिस्तानचे नेते अस्वस्थ दिसून येत आहे. ते रात्रंदिवस बरळत सुटले आहे. त्यांना झोपेत सुद्धा भारतीय लष्कर चालून आल्याचे स्वप्न पडत आहेत.
महिला खासदार काय बरळली
पाकिस्तानची महिला खासदार पलवाशा खान हिने बरळणाऱ्यांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. ती पाकिस्तान पीपल्स पार्टीची खासदार आहे. संसदेत बोलताना या बयेचे ताळतंत्र पूर्ण सुटले. तिच्यातील धर्मवेडेपणा उफाळून आला. पाकड्यांचे खायचे वांधे असताना त्यांच्या डोक्यात धर्माचे वेडं संचारले आहे. “अयोध्येत बाबरी मशीद उभी करू आणि पाकिस्तानच्या लष्कराचा प्रत्येक सैनिक त्या मशिदीचा पाया स्वत: विटा रचून भरेल. लष्करप्रमुख असीम मुनीर पहिली अजान देतील.” असे आगीत तेल ओतणारे वक्तव्य या महिला खासदाराने केले आहे. तिच्या वक्तव्याचा सोशल मीडियावर खरपूस समाचार घेतला गेला आहे.
Listen to the balderdash of Zardari’s spy girl, Palwasha Khan, who was used for an alleged honey trap, and former DGISI Lt Gen Zaheer ul Islam, who allegedly had to marry her because he got her pregnant. Are they still married? https://t.co/kvL2PRNoNu pic.twitter.com/PGTyCVAHsQ
— Adil Raja (@soldierspeaks) April 29, 2025
दिल्ली रक्ताच्या थारोळ्यात असेल
इतर नेत्यांप्रमाणेच पलवाशा खान सुद्धा पोकळ धमक्या देण्यात पुढे आली आहे. “जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीतल्या लाल किल्ल्याचं मैदान रक्ताने भरून जाईल.” असा विखार तिने पसरवला. “पाकिस्तान केवळ आपल्या ७ लाख सैनिकांवर नाही, तर २५ कोटी देशभक्त नागरिकांवर विश्वास ठेवतो.” असे पलवाशा म्हणाली.
कोण आहे पलवाशा खान?
पलवाशा खान ही पाकिस्तान पीपल्स पार्टीची खासदार आहे. 2008 मध्ये पंजाबमधील राखीव जागेवरून ती पहिल्यांदा खासदार झाली. 2016 मध्ये ISI चे माजी संचालक जहीर उल इस्लाम यांच्याशी तिने विवाह केला. तिच्यासह पाकिस्तानमधील अनेक नेते सध्या रात्रंदिवस बरळत असल्याचे समोर येत आहे. ते भडक विधानं करत आहेत.