Baba Vanga Prediction : बाबा वेंगाचे धक्कादायक भाकीत, 2028 मध्ये येणार नवीन युग, 3 वर्षानंतर दिसतील चमत्कारिक बदल
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. या भाकितानं जगाला अचंबित केले आहे. या भविष्यावाणीनुसार, 2028 मध्ये जगात मोठे बदल होतील. जणू एखादे नवीन युग सुरू होईल. मानवी आयुष्यात त्याचे मोठे परिणाम दिसून येतील.

बल्गेरियाची प्रसिद्ध भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिच्या भविष्यवाणीने जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. तिच्या एका भविष्यवाणीची मोठी चर्चा होत आहे. हे भाकीत अवघ्या तीन वर्षात, 2028 मध्ये अस्तित्वात येणार आहे. खरं ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भाकितानुसार, जगातून उपासमार हद्दपार होईल. मानव मंगळ ग्रहानंतर शुक्रावर पाऊल ठेवण्यासाठी मोहिम आखण्याची तयारी करेल. तर भविष्यात एक नवीन ऊर्जा स्त्रोत शोधला जाईल. जो मानवीय सभ्यतेसाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
बाबा वेंगाचे जीवन एखाद्या गूढ गोष्टीसारखे आहे. तिचा जन्म 1911 मध्ये बल्गेरिया येथे झाला होता. लहानपणी एका दुर्घटनेनंतर तिची दृष्टी गेली. पण तिला एक अद्भूत शक्ती मिळाली. त्या माध्यमातून तिला भविष्यातील घटना दिसू लागल्या. तिच्या अनुयायांनी तिने सांगितलेल्या भविष्यातील घटनांची नोंद केली. गूढ काव्यात या घटनांची नोंद घेण्यात आली आहे. तिची अनेक भाकीतं खरी ठरली आहे. यामध्ये कोरोना महामारी, 9/11 हल्ला, राजकुमारी डायना हिचा मृत्यु आणि 2004 मधील त्सुनामीचा उल्लेख आहे. तिने पृथ्वीवर एलियनचा मानवाशी संपर्क होईल असा दावा सुद्धा भाकितात केला आहे. समाज माध्यमावर त्याविषयीचे भाकीत करण्यात येत आहे. त्यानुसार यावर्षी दोन्ही देशात युद्ध होईल. त्यात पाकिस्तानमधील लष्करातील अनेक जण युद्धापूर्वीच माघारी फिरतील. काही जण लढतील, तर काही जण शरणागती पत्करतील. पाकिस्तानला हे युद्ध महागात पडेल असा दावा करण्यात येत आहे.
बाबा वेंगाची ती चर्चित भाकीतं
2025 : युरोपात अनेक बदल होतील. गटा-तटात युरोपाचे विभाजन
2028 : जगातून उपासमारी संपेल. मानवाला शुक्र खुणावेल. एक नवीन ऊर्जा स्त्रोताचा शोध लागेल.
2033 : हवामान बदलामुळे समुद्राची पाणी पातळी वाढेल, अनेक देशाचे भाग बुडतील
2043 : युरोपात इस्लाम धर्मियांचे प्राबल्य वाढेल
2046 : कृत्रिम मानवी अवयवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढेल
2066 : अमेरिका अत्यंत जहाल शस्त्र तयार करेल. त्यामुळे निसर्गाची मोठी हानी होईल.
डिस्क्लेमर : बाबा वेंगा यांच्या भविष्यवाण्या साधारणतः अस्पष्ट आणि विविध अर्थांनी सांगण्यात येतात. हा लेख केवळ माहितीपर आणि चर्चेच्या हेतूने देण्यात आला आहे. या दाव्याची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.
