Terror Attack : धक्कादायक, मशि‍दीच्या आत नमाज पठण सुरु असताना बाहेर धडाधडा चालवल्या गोळ्या

Terror Attack : नमाज पठाणानंतर सशस्त्र हल्लेखोर मशीद परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, असं प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Terror Attack : धक्कादायक, मशि‍दीच्या आत नमाज पठण सुरु असताना बाहेर धडाधडा चालवल्या गोळ्या
Terror Attack
Image Credit source: ITG
| Updated on: Oct 11, 2025 | 10:31 AM

अहमदी समुदायाच धार्मिक स्थळ बेत-उल-महदी मशि‍दीवर शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला. ही मशीद अहमदिया मुस्लिम समुदायाच मुख्य केंद्र आहे. नमाज अदा केल्यानंतर लगेच हल्ला झाला. यात अनेक स्वयंसेवक जखमी झालेत. सुरक्षा रक्षकांच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत एक हल्लेखोर ठार झाला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील चनाब नगरमध्ये ही घटना घडली.

नमाज पठाणानंतर सशस्त्र हल्लेखोर मशीद परिसरात घुसण्याचा प्रयत्न करत होते, असं प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. अहमदी समुदायाच्या वॉलंटियर्सनी तात्काळ कार्रवाई करत हल्लेखोरांना आत घुसण्यापासून रोखलं. दोन्ही बाजूंनी गोळीबार झााल. यात एक हल्लेखोर ठार झाला.

सतर्कता आणि साहसामुळे एक मोठं संकट टळलं

सुमदायाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉलंटियर्सची सतर्कता आणि साहसामुळे एक मोठं संकट टळलं. हल्लेखोरांनी मशि‍दीच्या आता प्रवेश केला असता, तर अजून मोठं नुकसान झालं असतं. जखमी वॉलंटियर्सना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्यांची हालत स्थिर आहे.

या समुदायाबद्दल द्वेष आणि हिंसेची भावना

हा हल्ला पाकिस्तानात अहमदी मुस्लिम समुदायावरील वाढत्या हल्ल्याच्या मालिकांच एक उदहारण आहे. अहमदी समुदाय दीर्घ काळापासून धार्मिक भेदभाव आणि हिंसेचा सामना करतोय. मानवाधिकार संघटनेनुसार,पाकिस्तानात या समुदायाबद्दल द्वेष आणि हिंसेची भावना आहे.

हल्ला का केला?

स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाला घेराव घातला असून तपास सुरु केला आहे. अजूनपर्यंत कुठल्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. “हा हल्ला समुदायाच्या मनात भितीची भावना निर्माण करणं आणि धार्मिक सदभाव कमी करण्याच्या उद्देशाने करण्यात आला” असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. अहमदी समुदायाने या हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करुन कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे.