AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानने चीनकडून घेतला होता फायटर जेट, हवेत उडतानाच इंधन टाकी पडली, जिनपिंग यांचा पाकशी विश्वासघात

पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांच्या तांत्रिक परिस्थितीवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नियमित घडणाऱ्या अशा घटनांवरून पाकिस्तानची विमाने तांत्रिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचे दिसून येते.

पाकिस्तानने चीनकडून घेतला होता फायटर जेट, हवेत उडतानाच इंधन टाकी पडली, जिनपिंग यांचा पाकशी विश्वासघात
Image Credit source: PTI
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 04, 2025 | 1:11 PM
Share

पाकिस्तानच्या पंजाबमधील सरगोधाच्या ग्रामीण भागात आश्चर्यकारक घटना घडली. पाकिस्तान हवाई दलाचे विमान टेक ऑफ करताना विमानाची इंधन टाकी आकाशातून जमिनीवर पडली. पाकिस्तानी हवाई दलाने हे फायटर जेट चिनीकडून घेतले होते. चीनने हे जेट पाकिस्तानला अत्यंत शक्तिशाली लढाऊ विमान असल्याचा दावा करत विकले होते. युद्धादरम्यान असे घडले तर काय होईल या विचाराने पाकिस्तानचे हवाईदल चिंतेत पडले आहे. विमानाच्या इंधनाची टाकी पडल्यामुळे अनेक गुरे जखमी झाल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये रावळपिंडीतील डोंगराळ भागात पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानाची इंधन टाकी पडली होती.

पाकिस्तानची विमाने कमकुवत

पाकिस्तानी पंजाबमधील सरगोधाच्या ग्रामीण भागात उड्डाण करत असताना पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानाची इंधन टाकी आकाशातून जमिनीवर पडली. तीन लढाऊ विमाने एकत्र उड्डाण करत असताना एका विमानाची इंधन टाकी वेगळी होऊन जमिनीवर पडल्याचे सांगण्यात येत आहे. सरगोधा हे पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख हवाई तळ आहे.

एप्रिल 2023 मध्ये रावळपिंडी रोडवरील डोंगराळ भागात पाकिस्तान हवाई दलाच्या लढाऊ विमानाची इंधन टाकी पडली होती. 1997 मध्येही कराचीतील एका निवासी भागात इंधनाची टाकी कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांच्या तांत्रिक परिस्थितीवर यापूर्वीही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नियमित घडणाऱ्या अशा घटनांवरून पाकिस्तानची विमाने तांत्रिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचे दिसून येते.

चीन देणार पाचव्या पिढीतील विमान

पाकिस्तानकडे सध्या चौथ्या पिढीची चिनी विमाने JF-17 थंडर आणि अमेरिकन F-16 फाल्कन आहेत. आता चीन आपले सर्वात आधुनिक, पाचव्या पिढीचे स्टेल्थ फायटर जेट जे-35 पाकिस्तानला देणार आहे. J-35 ट्विन इंजिन असलेले विमान एकाच पायलटद्वारे उडवले जाते. 56.9 फूट लांब आणि 15.9 फूट उंच या फायटर जेटचे टेकऑफ वजन 28 हजार किलोग्रॅम आहे. यात 7200 किलो इंधन आहे. परंतु आता एका जेटची इंधन टाकी पडल्यामुळे पाकिस्तान पुन्हा चीन विमानवर विश्वास ठेवणार का? हा प्रश्न आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?