Pakistan vs Afganistan : पाकिस्तानचा क्रूर चेहरा, अफगाणिस्तानात घुसून एअर स्ट्राइक, 11 निष्पाप लहान मुलांचा मृत्यू

Pakistan vs Afganistan : अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा सैन्य संघर्ष सुरु झाला आहे. पाकिस्तानी फायटर जेट्समधून काल अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात मोठा हल्ला करण्यात आला.

Pakistan vs Afganistan : पाकिस्तानचा क्रूर चेहरा, अफगाणिस्तानात घुसून एअर स्ट्राइक, 11 निष्पाप लहान मुलांचा मृत्यू
Pakistan Air Strike
| Updated on: Jun 10, 2026 | 9:32 AM

अमेरिका आणि इराणने परस्परांवर हल्ले केल्याने मध्य पूर्वेतील स्थिती चिघळलेली असताना आता अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष सुरु झाला आहे. मंगळवारी रात्री पाकिस्तानी एअर फोर्सच्या फायटर जेट्सनी अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीच उल्लंघन केलं. पाकिस्तानी एअर फोर्सने अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला. यात सर्वसामान्यांना टार्गेट करण्यात आलं. त्यांच्या घरावर बॉम्बफेक करण्यात आली.

पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी सैन्याने काल रात्री पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या संप्रभुतेच उल्लंघन केलं असं अफगाण सरकारचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिदने म्हटलं आहे. पाकिस्तानी फायटर जेट्सनी अफगाणिस्तानचे तीन प्रमुख प्रांत कुनार, खोस्त आणि पक्तिकामध्ये रहिवाशी भागांना लक्ष्य केलं, असं जबीउल्लाह यांनी सांगितलं. येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर अंदाधुंद बॉम्बफेक केली. त्यात अनेक घरं उद्धवस्त झाली.

मृतांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त

पाकिस्तानच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली आहे. एकूण 13 लोकांचा मृत्यू झाला. अफगाण प्रशासनाने त्यांना शहीद घोषित केलं आहे. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. या हल्ल्यात 11 मुलं, एक महिला आणि एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या शिवाय 14 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यात महिला आणि मुलं आहेत.

मन सून्न झालं

जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. अनेकांची प्रकृती नाजूक आहे. सोशल मीडियावर या हल्ल्यानंतर काही वेदनादायी फोटो समोर आले आहेत. त्यात पीडित मुलांची स्थिती पाहून मन सून्न झालं. या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान सरकारने संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. अशा अमानवीय गुन्ह्याचा आणि हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. हे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन असून सर्वसामान्यांविरुद्ध हा क्रूर गुन्हा असल्याचं अफगाणिस्तान सरकारने म्हटलं आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये अलीकडच्या काळात अनेकदा सैन्य संघर्ष झाला आहे. दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे.

 

Follow Us