
पाकिस्तानमध्ये लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान प्रश्न विचारणाऱ्या महिला पत्रकार अब्सा कोमल हिला पाहून ते डोळा मारताना दिसले. मात्र सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगगाने व्हायरल झाला, लोकांनी त्यांच्या वागण्यावर प्रचंड टीका केली आहे.
पाकिस्तानमधील पत्रकार परिषदेदरम्यान लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एका महिला पत्रकाराला प्रश्न विचारताना डोळा मारताना दिसत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे सोशल मीडियावर तर गदारोळ माजला असून लोकांनी त्यांच्यावर टीका करत हे कृत्य अशोभनयी असल्याचं म्हटलं आहे. खरंतर पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी हे एका पत्रकार परिषदेत होते, तिथे एका महिला पत्रकार अब्सा कोमल यांनी चौधरी यांना इम्रान खान यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारले. पण याच दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये चौधरी हे हसत, त्या पत्रकाराला “डोळा मारताना” दिसले. हा व्हिडिओ प्रचंड वेगाने ऑनलाइन पसरला आणि त्यावर खूप टीका झाली आहे.
सतत चर्चेत असतात जनरल चौधरी
इम्रान खान यांच्यावर लावलेले राष्ट्रीय सुरक्षेला धोका, देशद्रोही आणि दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करणारे आरोप, याबद्दल पत्रकार अब्सा कोमल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचं उत्तर देताना , चौधरी विनोदाने म्हणाले, “आणखी एक (आरोप) गोष्ट जोडा – तो (‘ज़ेहनी मरीज़) मानसिकदृष्ट्या आजारी आहे,” आणि हे बोलून नंतर त्यांनी पत्रकाराला डोळा मारला. मात्र त्यांचं हे वर्तन अनेकांना आवडलं नसून कित्येक नेटकऱ्यांनी त्याचं हे वागणं “अव्यावसायिक” असल्याचं म्हणत टीकास्त्र सोडलं.
Pakistan’s Army’s DG ISPR winking at a female journalist after she questioned why they are being labelled as funded by Delhi.
Honestly, I am not even surprised.pic.twitter.com/FzA4SMgSM8
— Elite Predators (@elitepredatorss) December 9, 2025
सार्वजनिक व्यासपीठावर एक गणवेशधारी अधिकारी असं कसं वागू शकतो, असा प्रश्न लोकांनी उपस्थित केला. पत्रकार परिषदांमध्ये अनेक टीकात्मक विधाने करून आणि इम्रान खानवर जोरदार शाब्दिक हल्ला करून जनरल चौधरी हे वारंवारचर्चेत येत अतात. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी देखील वादग्रस्त आहे, कारण त्यांचे वडील यापूर्वी दहशतवादी कारवायांशी जोडले गेल्याचा आरोप होता.
‘ज़ेहनी मरीज़’ म्हणजे काय ?
‘ज़ेहनी मरीज़’ हा एक उर्दू शब्द आहे. त्याचा साधारण अर्थ – मानसिकदृ्ष्ट्या आजारी व्यक्ती – असा अर्थ होतो. म्हणजेच ज्याची मानसिक स्थिती चांगली नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती. हा शब्द अनेकदा टोमणा किंवा अपमान म्हणून वापरला जातो.चौधरी यांनी याच शब्दाचा वापर केला असून त्यांच्या एकदंर कृतीमुळेच मोठी टीका केली जात आहे. अलिकडेच, चौधरी यांनी इम्रान खान यांना ‘अहंकारी’ आणि ‘मानसिक आजारी’ म्हटले होते आणि त्यांच्यावर लष्कराविरुद्ध खोट्या कथा रचल्याचा आरोपही केला होता.