Pakistan Blasphemy Case: पाकिस्तानात शाळेची मुख्याध्यापिका ईशनिंदा कायद्याची शिकार, कोर्टाकडून फाशीची शिक्षा

| Updated on: Sep 28, 2021 | 6:05 PM

लाहौर पोलिसांनी 2013 मध्ये एका स्थानिक मौलवीच्या तक्रारीवरून शाळेच्या मुख्याध्यापिकेविरोधात ईशनिंदेचा गुन्हा दाखल केला होता.

Pakistan Blasphemy Case: पाकिस्तानात शाळेची मुख्याध्यापिका ईशनिंदा कायद्याची शिकार, कोर्टाकडून फाशीची शिक्षा
ईशनिंदाप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला फाशीची शिक्षा (प्रातिनिधीक फोटो)
Follow us on

लाहौर: पाकिस्तानच्या सत्र न्यायालयाने एका शाळेच्या मुख्याध्यापकाला ईशनिंदा केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. लाहौरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सोमवारी निश्तर कॉलनीतील एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापिका सलमा तनवीरला फाशीची शिक्षा सुनावली. शिवाय तिला 5000 पाकिस्तानी रुपये दंडही ठोठावला. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मन्सूर अहमद यांनी निकालात म्हटलं की, तन्वीर यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आणि त्यांना इस्लामचा प्रेषित मानलं नाही. ( pakistan blasphemy case court sentences female school principal to death)

लाहौर पोलिसांनी 2013 मध्ये एका स्थानिक मौलवीच्या तक्रारीवरून तन्वीर यांच्याविरोधात ईशनिंदाचा केल्याचा गुन्हा दाखल केला होता. प्रेषित मोहम्मद यांना त्या इस्लामचा शेवटचा पैगंबर मानत नाही आणि स्वतःला इस्लामचा पैगंबर असल्याचा दावा करत या मौलवीने केला होता.

आतापर्यंत 1472 लोकांना आरोपी करण्यात आले आहे

वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या ‘पंजाब इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ’च्या वैद्यकीय मंडळाच्या अहवालात म्हटले आहे की,’ संशयिताची मानसिक स्थिती पूर्णपणे सुदृढ असल्याने ती शिक्षेसाठी आहे. ‘ अत्यंत कठोर असलेल्या कायद्यांतर्गत पाकिस्तानमध्ये आतापर्यंत किमान 1472 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 1987 पासून हा कायदा अस्तित्त्वात आहे. ईश्वरनिंदा प्रकरणातील आरोपींची केस घ्यायला सहसा कुणी तयार होत नाही. त्यामुळे त्यांना आवडीच्या वकीलांपासून वंचितच राहावं लागतं. शिवाय, मिळालेले वकीलही या प्रकरणांमधून काढता पाय घेण्याच्याच तयारीत असतात.

वसाहत युगातील ईशनिंदा कायदा

ईशनिंदा कायदा हा वसाहती-युगातील कायद्यांपैकी एक आहे. धर्माबद्दल कुणी काही बोलू नये, समाजावर धर्माचं वर्चस्व राहावं म्हणून असे कायदे करण्यात आले. मात्र पाकिस्तानात माजी हुकूमशहा जनरल झियाउल हक यांने या कायद्याला आणखी मजबूत केलं आणि शिक्षेची तीव्रता वाढवली. ईशनिंदा कायद्याचा पाकिस्तानमध्ये गेल्या बऱ्याच वर्षांपासून दुरुपयोग होत आहे. मानवाधिकार कार्यकर्ते या कायद्यावर टीका करतात. कारण, मुस्लिम बहुल देशात अल्पसंख्याक हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांविरुद्ध या कायद्याचा गैरवापर केला जातो. आतापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरलेल्या लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी कुणालाही अद्याप फाशी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा:

पेरलं तेच उगवणार, पाकिस्तानमध्ये आता जिनांचा पुतळाच बॉम्ब स्फोटात उडाला

तिनं असं काय केलं की 10 वर्षात तिची 35 कोटीची बचत झाली? वाचा याबाबत सविस्तर