तिनं असं काय केलं की 10 वर्षात तिची 35 कोटीची बचत झाली? वाचा याबाबत सविस्तर

केटी डोनेगनने सांगितले की सुमारे दोन वर्षांत आम्ही 42 हजार पौंड वाचवले, ज्यामुळे आम्ही 167,650 पौंडच्या दोन बेडरूमचे डिपॉझिट दिले. आम्ही 2013 मध्ये लग्न केले.

तिनं असं काय केलं की 10 वर्षात तिची 35 कोटीची बचत झाली? वाचा याबाबत सविस्तर
तिनं असं काय केलं की 10 वर्षात तिची 35 कोटीची बचत झाली? वाचा याबाबत सविस्तर

ब्रिटेन : महागड्या हॉटेल्समध्ये न जेवता आणि कपडे खरेदी न करता तब्बल 10 कोटी वाचू शकतात. हे एका महिलेने दाखवून दिले आहे. केटी डोनेगन असे महिलेचे नाव असून, गेल्या दोन वर्षांपासून केटी पती अॅलनसोबत अनेक देशांना भेटी देत ​​आहे. केटीने दावा केला आहे की उधळपट्टी थांबवून 10 कोटी रुपये वाचवले आणि वयाच्या 35 व्या वर्षी ती निवृत्त झाली. (What did keti donegan do that saved her Rs 35 crore in 10 years, Read more about this)

केटी डोनेगनने ‘द सन’ला सांगितले की, माझी आई अॅलिसन शिक्षिका आहे आणि वडील क्रिस मार्केट रिसर्चर आहेत. आमच्याकडे सामान्य लोकांसारखे जगण्यासाठी पैसे होते, पण हॉलिडे किंवा महागड्या हॉटेल्समध्ये जेवण्यासाठी पैसे नव्हते. मी नेहमी माझे पॉकेटमनी वाचवत होते, मला हे पैसे खर्च करण्यापेक्षा पाहून अधिक आनंदी होत होता.

स्वस्त हॉटेलमध्ये खा आणि पैसे वाचवा

केटी डोनेगन पुढे म्हणाली की, सुरुवातीला मी 9 पौंड प्रति तास (एक पाउंड म्हणजे सुमारे 100.82 रुपये) काम केले, त्यानंतर जानेवारी 2005 मध्ये मी कोस्टा रिकाला गेले आणि तेथे अॅलनला भेटले, त्यानंतर मी युकेला परतले आणि अभ्यास सुरु केला. या दरम्यान मी अवाजवी खर्च करणे बंद केले, नवीन कपडे खरेदी केले नाही, स्वस्त रेस्टॉरंटमध्ये अन्न खाल्ले आणि कोणाकडूनही कर्ज घेतले नाही.

केटी डोनेगन यांनी सांगितले की, 2008 मध्ये आम्ही आमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अॅलनच्या आईकडे गेलो. त्यामुळे आम्हाला घराचे डिपॉझिट भरावे लागले नाहीत. सुरुवातीला मला वर्षाला 28,500 पौंडची नोकरी मिळाली. अॅलन शिकवत होता. आम्ही पॅकेट फूड खात होतो. जुनी कार चालवत होतो आणि महागड्या नाईट आऊटऐवजी आमच्या घरीच पार्टी करत होतो.

दोन वर्षात 42 हजार पौंड वाचवले

केटी डोनेगनने सांगितले की सुमारे दोन वर्षांत आम्ही 42 हजार पौंड वाचवले, ज्यामुळे आम्ही 167,650 पौंडच्या दोन बेडरूमचे डिपॉझिट दिले. आम्ही 2013 मध्ये लग्न केले. लग्नासाठी स्थानिक कम्युनिटी हॉल बुक केले, लोकांना ई-मेल द्वारे आमंत्रणे पाठवली, मित्रांनी सजावट केली आणि कमी खर्चात लग्न केले.

केटी डोनेगन म्हणाली की 2014 पर्यंत मी दरवर्षी 58000 पौंड कमवायला सुरुवात केली, पतीच्या उत्पन्नासह ते 63000 पौंड झाले, आम्ही दरमहा 3 हजार पौंड वाचवले, 2015 मध्ये मी शेअर बाजारात पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि याचा फायदा व्हायला लागला. आमच्याकडे 2,91,000 पौंडची बचत झाली. आम्ही आमचे लक्ष्य 1 दशलक्ष पौंड ठेवले होते.

केटी डोनेगनने सांगितले की, 2018 पर्यंत, आम्ही 898,000 पौंडची बचत केली आणि गुंतवणूक केली. या मार्च 2018 ते एप्रिल 2019 पर्यंत आम्ही आमच्या गुंतवणूकीवर 46,000 पौंडची कमाई केली. आम्ही एक दशलक्ष पौंडचे लक्ष्य पूर्ण केले आणि नंतर मी 35 वर्षे वयामध्ये कामावरून निवृत्ती घेतली.

केटी डोनेगन म्हणाली की, ती तिच्या गुंतवणूकीतून दरवर्षी 65 हजार पौंड कमवते. आता केटी डोनेगन आणि तिचा पती अॅलन यांनी नोकरी सोडली आहे आणि दोघेही वेगवेगळ्या देशांच्या टूरवर गेले आहेत. केटी म्हणते की आजही ती अवाजवी खर्च करत नाही आणि लोकांना पैसे वाचवण्यासाठी मोफत सल्ला देते. (What did keti donegan do that saved her Rs 35 crore in 10 years, Read more about this)

इतर बातम्या

चंदनाच्या लाकडापेक्षा हजारो पटीने महाग, एक ग्रॅमची किंमत तब्बल 7 लाख, भारतात जगातलं सर्वात दुर्मिळ लाकूड

जळगाव जिल्हा बँक निवडणूक; एकनाथ खडसे, गिरीश महाजनांमध्ये एकमत होणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI