जळगाव जिल्हा बँक निवडणूक; एकनाथ खडसे, गिरीश महाजनांमध्ये एकमत होणार?

महत्वाची बाब म्हणजे या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात एकमत होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज पार होत असलेली बैठक ही चर्चेची दुसरी फेरी आहे. या बैठकीनंतर सर्वपक्षीय पॅनलवर शिक्कामोर्तब होणार की सर्वपक्षीय पॅनलचा मुद्दा बारगळणार हे स्पष्ट होणार आहे.

जळगाव जिल्हा बँक निवडणूक; एकनाथ खडसे, गिरीश महाजनांमध्ये एकमत होणार?
एकनाथ शिंदे, गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 8:52 PM

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगानं सर्वपक्षीय नेत्यांची अजिंठा शासकीय विश्रामगृहात बैठक सुरु होती. या बैठकीत सर्वपक्षीय पॅनल तसंच जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाची बाब म्हणजे या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यात एकमत होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज पार होत असलेली बैठक ही चर्चेची दुसरी फेरी आहे. या बैठकीनंतर सर्वपक्षीय पॅनलवर शिक्कामोर्तब होणार की सर्वपक्षीय पॅनलचा मुद्दा बारगळणार हे स्पष्ट होणार आहे. (Jalgaon District Bank elections Meeting of all party leaders)

दरम्यान, जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी पार पडत असलेल्या या बैठकीला पालकमंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजप नेते गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार सुरेश भोळे, शिरीष चौधरी आणि संदीप पाटील उपस्थित होते.

30 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय नेत्यांची पहिली बैठक

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने 30 ऑगस्ट रोजी सर्वपक्षीय नेत्यांची पहिली बैठक पार पडली होती.. या बैठकीत बँकेची निवडणूक चारही पक्षांच्या सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित मानलं जात होतं. पुढच्या एक-दोन बैठकांमध्ये जागा वाटपाचा तिढाही सुटेल, असा विश्वास नेत्यांनी वर्तवला होता. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य असलेली कोअर कमिटी गठीत झाली आहे. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन हे एकत्र आले होते.

भाजपच्या 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, पण धक्का कुणाला?

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा गड असलेल्या जळगावात भाजपला मोठे धक्के बसत आहेत. 24 सप्टेंबर रोजी बोदवडमधील 11 नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक होते. त्यामुळे हा धक्का नेमका कुणाला? अशी चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.

भाजपच्या बोदवडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 11 नगरसेवक यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय. पूर्वी मुक्ताईनगरचे 6 नगरसेवक शिवसेनेते दाखल झाले होते. मुक्ताईनगरचे गटनेतेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच अर्थ तिथल्या आमदारांनी केलेली कामं आणि जनतेचा मिळवलेला विश्वास आणि उद्धव साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात मुक्ताईनगर जिल्हा परिषदेमध्येही अशीच स्थिती राहील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.

इतर बातम्या : 

आता टार्गेट रश्मी ठाकरे! उद्धव ठाकरेंनी बंगले घेण्यासाठी रश्मी वहिनींचा वापर केला; सोमय्यांचा घणाघात

पहिल्या अनुभवातून सरकारनं धडा घेतला? सोमय्यांवरची कोल्हापूर जिल्हा बंदी उठवली, मुश्रीफांचा इशारा कायम

Jalgaon District Bank elections Meeting of all party leaders

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.