AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेरलं तेच उगवणार, पाकिस्तानमध्ये आता जिनांचा पुतळाच बॉम्ब स्फोटात उडाला

पाकिस्तानने दहशतवादाचं जे बीज पेरलं, त्याचाच विळखा पाकिस्तानला आता बसत आहे. कारण, अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा पुतळाच नष्ट करण्यात आला आहे.

पेरलं तेच उगवणार, पाकिस्तानमध्ये आता जिनांचा पुतळाच बॉम्ब स्फोटात उडाला
उजव्या बाजूला जिन्नांचा पुतळा, डाव्या बाजूला पुतळ्यावरील हल्ल्यानंतरही परिस्थिती
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 5:44 PM
Share

इस्लामाबाद: दहशतवादाला पोसणाऱ्या आणि जगात पसरवणाऱ्या पाकिस्तानला आता दहशतवादाच्या किडीनेच पोखरायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानने दहशतवादाचं जे बीज पेरलं, त्याचाच विळखा पाकिस्तानला आता बसत आहे. कारण, अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचा पुतळाच नष्ट करण्यात आला आहे. डॉन या पाकिस्तानच्या वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. ( A statue of Pakistan’s founder Mohammad Ali Jinnah was destroyed in a bomb blast in Balochistan)

बलुचिस्तानमधील ग्वादर शहरात हल्ला

बलुचिस्तान प्रांतातील किनारपट्टीच्या भागात असणाऱ्या ग्वादर शहरात हा हल्ला करण्यात आला. पर्यटकांच्या वेशात बलुच विद्रोही इथं आले, आणि पुतळ्याखाली स्फोटकं ठेवल्याची माहिती आहे. या स्फोटात पुतळा पूर्णपणे नष्ट झाला आहे. प्रतिबंधित अतिरेकी संघटना बलुच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बाबगार बलूच यांनी ट्विटरवर स्फोटाची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती बीबीसी उर्दूने दिली आहे.

पर्यटकांच्या वेशात आले अतिरेकी

या प्रकरणाची आता उच्चस्तरिय चौकशी समिती नेमण्यात आल्याची माहिती ग्वादरचे उपायुक्त निवृत्त मेजर अब्दुल कबीर खान यांना बीबीसी उर्दूला दिली. ते म्हणाले की, स्फोटकं लावून जिनांचा पुतळा नष्ट करणाऱ्या अतिरेक्यांनी पर्यटक म्हणून या भागात प्रवेश केला. ते म्हणाले की, ” आतापर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र तपास 1 ते 2 दिवसात पूर्ण होईल. आम्ही या प्रकरणाचा सर्वबाजून तपास करत आहोत. या प्रकरणातील दोषींना लवकरच पकडले जाईल. ज्याप्रकारे आम्ही झियारतमधील कायद-ए-आझम निवासस्थानावरील हल्ल्यामागे होते हे उघडकीस आणलं होतं, तसंच इथं होईल.

2013 मध्ये जिन्नांची बंगल्यात स्फोट

2013 मध्ये, बलूच अतिरेक्यांनी जिन्नांनी वापरलेली 121 वर्ष जुनी इमारत झियारतमध्ये स्फोटकं लावली होती. स्फोटानंतर तब्बल 4 तास अग्नितांडव सुरु होतं. या आगीत महागडं फर्निचर आणि ऐतिहासिक गोष्टी नष्ट झाल्या. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात जिन्नांना क्षयरोगानं ग्रासलं होतं, त्यावेळी त्यांनी आयुष्याचे शेवटचे दिवस याच इमारतीत घालवले होते. जिन्नांच्या मृत्यूनंतर हे राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं. 25 डिसेंबर 1876 रोजी जन्मलेले जिन्नांनी 1913 पासून 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानच्या निर्मितीपर्यंत अखिल भारतीय मुस्लिम लीगचे नेते म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी 1948 पासून पाकिस्तानचं गव्हर्नरपद भूषवलं.

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

पाकिस्तानच्या निर्मितीवेळी बलुचिस्तानवर पाकिस्तानने अनधिकृतपणे ताबा मिळवल्याचा आरोप बलुच नागरिक करतात. त्यामुळे पाकिस्तानविरोधात ते नेहमीच विद्रोही कारवाया करत असतात. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी बलुच लोकांची आहे. बलुचिस्तान हा भाग खनिजसंपत्तीने स्वयंपूर्ण आहे, त्यामुळे पाकिस्तान बलुचिस्तानचं नेहमी शोषण करतो, असं बलुच लोक मानतात. त्यामुळेच पाकिस्तानी सरकारविरोधात, सैन्याविरोधात या भागातून कारवाया सुरु असतात.

हेही वाचा:

ग्राहकाची दाढी कापली, ट्रीम केली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, तालिबान्यांचा सलून चालकांना फतवा

Zakir Naik : झाकीर नाईक मुलासाठी मुलगी शोधतोय, फेसबुक पोस्टद्वारे सांगितल्या अटी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.