Zakir Naik : झाकीर नाईक मुलासाठी मुलगी शोधतोय, फेसबुक पोस्टद्वारे सांगितल्या अटी

भारतात धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप असलेले विवादित इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक आता त्यांच्या मुलासाठी मुलगी शोधत आहेत. आपल्या सुनेच्या शोधाचा भाग म्हणून झाकीर नाईकने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक मोठी पोस्ट टाकली आहे.

Zakir Naik : झाकीर नाईक मुलासाठी मुलगी शोधतोय, फेसबुक पोस्टद्वारे सांगितल्या अटी
Zakir Naik


क्वाललंपूर: भारतात धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप असलेले विवादित इस्लामिक धर्मगुरु झाकीर नाईक आता त्यांच्या मुलासाठी मुलगी शोधत आहेत. आपल्या सुनेच्या शोधाचा भाग म्हणून झाकीर नाईकने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर एक मोठी पोस्ट टाकली आहे. यामध्ये त्याने त्याला कशी सून हवी आहे ते सांगितले आहे.

झाकीर नाईकने फेसबुकवर लिहिले, ‘मी माझा मुलगा फरिकसाठी वधू शोधत आहे. तो चांगल्या चारित्र्याच्या धार्मिक मुस्लीम मुलीचा शोध घेत आहे. जेणेकरून माझा मुलगा आणि त्याची पत्नी एकमेकांसाठी शक्ती बनू शकतील. जर तुम्ही अशा मुलीचे वडील किंवा नातेवाईक असाल तर या पोस्टवरील कमेंटमध्ये उत्तर द्यावं’, असं आवाहन केलं आहे.

फेसबूकवर लिहिलेल्या प्रदीर्घ पोस्टमध्ये झाकीर नाईकने त्याच्या मुलाबद्दल आणि कुटुंबाविषयी माहितीही शेअर केली आहे. यासोबतच पात्र मुलींकडून बायोडेटाही मागवण्यात आला आहे. झाकीर नाईकने त्या पोस्टमध्ये ग्राफिक्समध्ये त्याच्या मुलाचे चित्र ठेवले नाही. यामध्ये त्याने स्वतःचे चित्र शेअर केले आहे.

भारतासाठी झाकीर नाईक मोस्ट वाँटेड

झाकीर नाईक सध्या भारतासाठी मोस्ट वाँटेड असून तो मलेशियात राहतो. त्याने आपल्या भावी सूनबाबत काही अटीही ठेवल्या आहेत. त्यांच्या मते, मुलीचा कोणत्याही इस्लामिक संघटनेशी संबंध खूप महत्वाचा आहे. मुलीने कुराण आणि हदीसमध्ये सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण करणे आवश्यक आहे. यासोबत ती मुलगी सर्व हराम कारवायांपासून दूर राहील. मुलीचे चरित्र चांगले असावे आणि धार्मिक असावे. सून ही इस्लामची शिकवण पसरवणारी असावी. अलिशान जीवनापासून दूर राहणारी आणि सामान्य जीवन जगण्यावर विश्वास ठेवणारी असावी. तिला इंग्रजी बोलता आले पाहिजे आणि मलेशियात राहण्याची इच्छा असावी, असं झाकीर नाईकनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

याशिवाय झाकीर नाईकने अनेक अटी घातल्या आहेत. त्याने इच्छुक कुटुंबांना मुलीचा बायोडाटा पाठवण्यास सांगितले आहे. आता त्याच्या या फेसबूक पोस्टवर अनेक मुलींच्या कमेंट्स येत आहेत. त्यांच्यापैकी बहुतेकांचे म्हणणे आहे की ‘तुम्हाला अशी मुलगी कुठेही सापडेल.’

आरोग्य विद्यापीठाच्या वेबसाईटवरुन झाकीर नाईकचे नाव हटवा, अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“दहशतवादी कारवायांमध्ये प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागाप्रकरणी झाकीर नाईक आरोपी असून चौकशी टाळण्यासाठी तो फरार झाला आहे. करोडो रुपयांची अफरातफर व हवाला रॅकेट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. बांग्लादेश, इंग्लंड यांसह अनेक देशांमध्ये जाकीर नाईकला प्रवेशास व ऑनलाइन भाषण देण्यास सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे”,असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं होतं. देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीचे नाव एखाद्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत नोंदवणे ही अत्यंत आक्षेपार्ह व लाजिरवाणी बाब असून राज्य सरकारने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वेबसाईटवरून झाकीर नाईक याचे नाव हटविण्यासाठी आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी केली होती.

Zakir naik looking for muslin girl for his son wrote Facebook post

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI