पाकिस्तानने टाकला मोठा डाव, घेतला असा निर्णय ज्याने मुनीरचं बळ वाढणार; भारताला काय धोका?

भारताला डिवचण्यासाठी पाकिस्तान नेहमीच काहीतरी कुरापती काढत असतो. दरम्यान, आता पाकिस्तानने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुनीरची ताकद वाढली आहे.

पाकिस्तानने टाकला मोठा डाव, घेतला असा निर्णय ज्याने मुनीरचं बळ वाढणार; भारताला काय धोका?
asim munir
| Updated on: Sep 04, 2025 | 3:49 PM

Pakistan Asim Munir : भारत आणि पाकिस्तान यांच्यात कायमच उघड-उघड संघर्ष पाहायला मिळालेला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर तर या दोन्ही देशांत युद्धसदृश स्थिती निर्माण झाली होती. या दोन्ही देशांकडून एकमेकांना उघड धमकी दिली जात होती. सध्या सीमेवर परिस्थिती सामान्य आहे. पण पाकिस्तानात घेतलेल्या काही निर्णयांचा भारतावर परिणाम होत असतो. सध्या असाच एक मोठा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. या निर्णयामुळे आता पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर याची ताकद चांगलीच वाढणार आहे.

पाकिस्तानी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तान लष्कर या दोघांनी मिळून एक मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानच्या लष्करी नेतृत्त्वास 10 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पाकिस्तानात सध्या चालू असलेल्या यंत्रणेत कोणताही तांत्रिक अडथळा निर्माण होऊ नये, पाकिस्तानात दीर्घकाळासाठी राजकीय तसेच आर्थिक स्थैर्य राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान मुस्लीन लिग-नवाज पक्षाचे सर्वोच्च नेते नवाज शरीफ यांच्या मुर्री येथील फार्महाऊस एक बैठक पार पडली. या बैठकीला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज, आर्मी चिफ फिल्ड मार्शल असीम मुनीर तसेच आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मुलिक उपस्थित होते.

या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात आला?

या बैठकीत सर्वसंमतीन पाकिस्तानचा लष्करप्रमुख अमीम मुनीर याला लष्करप्रमुख म्हणून 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. मुनीर याचा कार्यकाळ 28 नोव्हेंबर 2025 रोजी संपुष्टात येणार होता. 2022 साली त्याला तीन वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले. मात्र पाकिस्तान आर्मी अॅक्टमध्ये बदल झाल्यानंतर असीम मुनीर याची खुर्ची कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. 2035 सालापर्यंत मुनीर लष्करप्रमुख पदावर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भारताला काय धोका असणार?

दरम्यान, आता असीम मुनीर याला लष्करप्रमुख पदासाठी मुदतवाढ मिळाल्यानंतर त्याचा भारतावर काय परिणाम होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने हल्ले केल्यानंतर मुनीर याच्याच निर्देशानंतर पाकिस्तान लष्करानेही भारतावर हवाई हल्ले केले होते. पाकिस्तानच्या या प्रत्युत्तरात असीम मुनीर याचा महत्त्वाचा सहभाग होता. गेल्या बऱ्याच वर्षापासून मुनीर पाकिस्तानी लष्कराला दिशा देत आहे. आता त्याला मुदतवाढ मिळाल्यानंतर पाकिस्तानचे भारताविषयीचे धोरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे खरे ठरले तर भारतालाही सतर्क राहावे लागेल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.