पाकिस्तानात अंतर्गत कलह! बलुचनंतर ‘या’ समाजानेही उपसले बंडाचे हत्यार, सरकार चिंतेत

पाकिस्तानात गेल्या काही काळापासून अंतर्गत कलह सुरु आहे. बलुचिस्ताननंतर आता खैबर पख्तूनख्वा प्रांतात हिंसाचाराला सुरुवात झाली आहे.

पाकिस्तानात अंतर्गत कलह! बलुचनंतर या समाजानेही उपसले बंडाचे हत्यार, सरकार चिंतेत
pakistan pathan
| Updated on: Jul 19, 2025 | 4:31 PM

पाकिस्तानात गेल्या काही काळापासून अंतर्गत कलह सुरु आहे. बलुचिस्ताननंतर आता खैबर पख्तूनख्वा प्रांतात हिंसाचाराला सुरुवात झाली आहे. आता पठाणांनीही पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बंड पुकारले आहे. पाक सेना वझिरीस्तानमध्ये पठाणांना मारत असल्याने पठाण समाजात नाजारी पसरली आहे. त्याचबरोबर तुरुंगात असलेले पठाण इम्रान खान यांनी मारण्याचा कट उघडकीस आला आहे, त्यामुळे पठाण समाज भडकला आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी एक पत्र लिहून, आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते, जर मला काही झाले तर त्यासाठी असीम मुनीर थेट जबाबदार असतील असं ते म्हणाले होते. तसेच इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने इम्रान खान यांना तुरुंगाच्या डेथ सेलमध्ये बंद केले असल्याची माहिती दिली होती.

इम्रान खान यांच्या पत्नीवरही अत्याचार

इम्रान खान यांनी पत्नी बुशरा बीबीवरही अत्याचार केले जात असल्याचे म्हटले आहे. तसेच या दोघांच्या सेलचे वीज कनेक्शनही कापण्यात आले आहे. या दोघांना तुरुंगात कोणालाही भेटू दिले जात नाही. याच काळात इम्रान खान यांच्या बहिणीने असीम मुनीरने इम्रान खानला मारण्याचा कट रचला आहे असा दावाही केला होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, इम्रान खान यांची दोन्ही मुले लंडनहून पाकिस्तानात परतली आहेत आणि ती खैबर पख्तूनख्वा येथे सुरू असलेल्या बंडात सामील झाली आहेत. आता इम्रान खान यांचा पीटीआय पक्ष 5 ऑगस्ट रोजी संपूर्ण पाकिस्तानात निदर्शने करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानात 18 टक्के पठाण

पाकिस्तानातील 18 टक्के लोकसंख्या पठाण समाजाची आहे. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर भागात हे पठाण राहतात. हा भाग पीटीआय पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. सध्या फक्त खैबर प्रांतात पीटीआयचे सरकार आहे. कारण इम्रान खान यांच्या पक्षाने येथे खूप विकासकामे केली आहेत. याच भागात पठाणांनी पाक सरकारविरोधत बंडाचे हत्यार उपसले आहे.

बलूच समाजाचा लढा सुरु

समोर आलेल्या माहितीनुसार, बलुचस्तानात बलुच सैन्य पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करत आहेत. यामुळे क्वेटा आणि आसपास कलम 144 लागू करण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये बलुच सैन्याने 286 हल्ले केले असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील 780 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी बलुच सैन्याने साबरी ब्रदर्सच्या 3 कव्वालांची हत्या केली. त्यामुळे गेल्या काही काळापासून पाकिस्तान सरकार चिंतेत आहे.