PakVac: पाकिस्तानकडून स्वदेशी पाकव्हॅक लसीचं लाँचिंग, मात्र चाचण्यापासून परिणामांपर्यंत माहिती लपवली?

| Updated on: Jun 02, 2021 | 5:08 PM

आता पाकिस्तानने देखील स्वदेशी कोरोना विरोधी लस शोधल्याचा दावा केलाय. पाकिस्तानने PakVac नावाची लस लाँच केलीय.

PakVac: पाकिस्तानकडून स्वदेशी पाकव्हॅक लसीचं लाँचिंग, मात्र चाचण्यापासून परिणामांपर्यंत माहिती लपवली?
Follow us on

इस्लामाबाद : जगभरात कोरोनाचा सामना करण्यासाठी कोरोना लस हाच दुरगामी उपाय असल्याचं मान्य करण्यात आलंय. त्यात कोरोना लसींचा तुटवडाही जाणवत आहे. अशातच आता पाकिस्तानने देखील स्वदेशी कोरोना विरोधी लस शोधल्याचा दावा केलाय. पाकिस्तानने PakVac नावाची लस लाँच केलीय. आगामी काळात मोठ्या प्रमाणात लस निर्मिती करुन लसीकरणाचा वेग वाढवण्यात येईल, असं पाकिस्तानने म्हटलंय. मात्र, पाकिस्तानच्या कोरोना लसींच्या किती चाचण्या झाल्या, त्यांचे परिणाम काय आहेत? याबाबत कोणतीही माहिती जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या लसीबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहेत (Pakistan launch PakVac Covid 19 Corona Vaccine but no testing information available).

पाकिस्तानने आपल्या स्वदेशी लसीचं नाव ‘PakVac Covid-19 Vaccine’ असं ठेवलंय. या लसीची निर्मिती नॅशनल कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे (NCOC) प्रमुख असद उमर आणि पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांचे आरोग्य सल्लागार डॉ. फैसल सुल्तान यांनी केलीय. याच्या लाँचिंग कार्यक्रमात बोलताना असद उमर म्हणाले, “कोरोना साथीरोगाने संपूर्ण जगासमोर आव्हान उभं केलंय. सध्या सर्वाधिक मागणी कोरोना विरोधी लसीला आहे. इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानमध्ये स्थिती चांगली आहे. कोणताही आज कोणत्याही सीमेचा विचार करत नाही आणि धर्मातही भेदभाव करत नाही.”

पाकिस्तान देशात रुग्णालय उभारणीसाठी 60 अब्ज रुपये खर्च करणार

“या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाकिस्तान महत्त्वाचे निर्णय घेत आहे. यानुसार देशात पुरेसे रुग्णालय असण्यासाठी तातडीने पाऊलं उचलली जात आहेत. केंद्र सरकारने पीएसडीपीमध्ये मेगा हेल्थ प्रोजेक्टचा समावेश केलाय. देशाला NIH च्या पथकांच्या कामाचा अभिमान आहे. सरकार आपल्या कमतरतांमधून धडा घेत आहे. आरोग्यवरील केंद्रीय आर्थिक तरतूद वाढवण्यात आलीय. लवकरच सर्व गोष्टींमध्ये सुधारणा होईल,” असंही असद उमर यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

पाकिस्तानी मच्छिमाराच्या जाळ्यात 48 किलोंचा मासा, किंमत 25 लाख? 50 लाख? तब्बल…

बोर्डाच्या परीक्षा घेणार की प्रमोट करणार? पाकिस्तानात दहावी बारावीच्या परीक्षांवर काय चाललंय?

सौदी अरबचा भारताला झटका, पाकिस्तानवरील निर्बंध हटवले मात्र भारतीयांना प्रवेशबंदी कायम

व्हिडीओ पाहा :

Pakistan launch PakVac Covid 19 Corona Vaccine but no testing information available