AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan New PM : पाकिस्तानात सत्ता स्थापनेचा तिढा सुटला, पाहा कोण होणार पंतप्रधान?

Pakistan PM : पाकिस्तानात नव्या सरकार स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. दोन पक्ष मिळून सत्ता स्थापन करणार असून एका पक्षाचा पंतप्रधान तर एका पक्षाचा राष्ट्रपती होणार आहे. पाकिस्तानात इम्रान खान यांच्या समर्थनात निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. पण बहुमत न मिळाल्याने त्यांना सत्तेपासून लांब राहावे लागणार आहे.

Pakistan New PM : पाकिस्तानात सत्ता स्थापनेचा तिढा सुटला, पाहा कोण होणार पंतप्रधान?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Feb 21, 2024 | 9:07 PM
Share

Pakistan PM : पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर आता सरकार स्थापनेचा राजकीय तिढा सुटला आहे. पाकिस्तानातील दोन प्रमुख पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांच्यात युती झाली आहे. शाहबाज शरीफ हे या पंतप्रधान होणार असल्याचं समोर आले आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पीपीपी आणि पीएमएल-एनच्या प्रमुख नेत्यांनी पुष्टी केली की ते देशाच्या व्यापक हितासाठी सरकार स्थापन करण्यासाठी आघाडीत सामील होत आहेत.

आसिफ अली झरदारी हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी पुष्टी केली की, शाहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर आसिफ अली झरदारी हे देशाचे राष्ट्रपती होतील. “पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज यांच्याकडे आता बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे ते पुढील सरकार स्थापन करणार आहेत. बिलावल भुट्टो-झरदारी यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, देशाला सध्याच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी दोन्ही पक्ष पुढील सरकार स्थापन करतील. आम्ही मान्य केले आहे की आम्हाला भविष्यातील पिढ्यांसाठी पाकिस्तानचे यश सुनिश्चित करायचे आहे.”

बिलावल यांच्याकडून कोणत्याही मंत्रिपदाची मागणी नाही – शाहबाज

पीपीपीला कोणती मंत्रीपदे मिळतील याबाबत विचारणा केली असता. शाहबाज म्हणाले की बिलावल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाने पहिल्या दिवसापासून कोणत्याही मंत्रिपदाची मागणी केलेली नाही. दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरु होती आणि परस्पर संवादातून प्रश्न सोडवले जातात. याचा अर्थ आम्ही त्यांच्या मागण्या मान्य करतो किंवा त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या असा होत नाही. त्यांची स्वतःची मते आहेत.

कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही

8 फेब्रुवारी रोजी झालेल्या पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे पंतप्रधान कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होते. आता या दोन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय़ घेतला आहे. सार्वत्रिक निवडणुकीत, इम्रान खान यांच्य़ा पीटीआय समर्थित अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक 92 जागा जिंकल्या होत्या. पीएमएल-एनला 79 तर पीपीपीने 54 जागा जिंकल्या आहेत.

इम्रान खान यांच्या पक्षावर बंदी घातल्याने त्यांना निवडणूक लढवता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या समर्थनातून अनेक उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.

Follow Us
गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त...
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटलांना मोठा धक्का; चार शासननियुक्त संचालकांमुळे सत्तेचं गणितच बदललं
समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; सहा महिन्यांत 8 वेळा दगडफेक, 5 वेळा लुटमार; प्रवाशांमध्ये भीती
शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे....
Shivsena Hearing Case : शिवसेना सुनावणीत अपात्रतेचा पेच पुन्हा ऐरणीवर; पुढील सुनावणीकडे राज्याचं लक्ष 
शिंदे गटाचे वकील मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नवा ट्विस्ट; शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहतांनी मांडला व्हीपचा महत्त्वाचा मुद्दा, म्हणाले...
आमदार-खासदार विकत घ्यायला खोक्यांचे पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो
Aaditya Thackeray : आमदार-खासदार विकत घ्यायला खोके भरून पैसे, शेतकऱ्यांना मदत करताना शेकडो अटी; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत