आणखी एका देशाने भारतासोबत केली मैत्री, चीन आणि पाकिस्तानला लागली मिर्ची
भारताचे संबंध अनेक देशांसोबत अधिक घट्ट होत आहेत. आखाती देश असो की युरोप भारत अनेक देशांसोबत व्यापार वाढवण्यावर भर देत आहे. दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी देखील भारताने अनेक देशांसोबत करार केला आहे. अनेक मुस्लीम देशांसोबत भारताचे वाढते संबंध पाहता पाकिस्तानला देखील धक्का बसला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा मान जगात वाढत आहे. फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि सौदी अरेबिया या देशांनी भारतासोबतची मैत्री आणखी मजबूत केली आहे. आता या यादीत आणखी एका नवीन देशाचे नाव जोडले गेले आहे. तो देश म्हणजे ग्रीसच. ग्रीस हा एक देश व्यापाराच्या दृष्टीने एक महत्त्वाचे केंद्रबिंदू आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी चर्चा केली आणि भारताची मैत्री एका नव्या उंचीवर नेली आहे. भारत आता युरोपपासून अरब आणि आखाती देशांपर्यंत भारताची मैत्री वाढली आहे. भारताबाबत विश्वासार्हता वाढत आहे. यामुळे पाकिस्तान आणि चीनला मात्र झटका लागला आहे.
अनेक क्षेत्रात भागीदारी वाढणार?
भारत आणि ग्रीस यांच्यात बुधवारी व्यापार, संरक्षण उत्पादन तसेच दहशतवादाच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये आता भागीदारी वाढली आहे. एकमेकांना सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर ही चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीकचे पंतप्रधान किरियाकोस मित्सोटाकिस यांच्याशी व्यापक चर्चा केली. मित्सोटाकिस हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. 15 वर्षांत ग्रीक राष्ट्रप्रमुखांची ही पहिलीच भारत भेट आहे.
भारत आणि ग्रीस यांच्यात सहकार्य वाढणार
पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आणि ग्रीस यांच्यात समान चिंता आणि प्राधान्ये आहेत. आम्ही दहशतवादाचा सामना करण्यासाठी सहकार्य आणखी मजबूत कसे करता येईल यावर सविस्तर चर्चा केली. संरक्षणाच्या बाबतीत भारत आणि ग्रीस यांच्यात वाढत असलेले सहकार्य हे दोन्ही देशांमधील खोल परस्पर विश्वासाचे प्रतिबिंब आहे. आम्ही भारत आणि ग्रीसमधील भागीदारी मजबूत करण्यावर चर्चा झाली. हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरू शकते. सर्व वाद आणि तणाव संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवला गेला पाहिजे.”
पंतप्रधान मोदी यांनी ग्रीसच्या सक्रिय सहभागाचे आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सकारात्मक भूमिकेचे स्वागत केले. मोदी म्हणाले की, “आम्ही भारत आणि ग्रीस यांच्यातील कृषी क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा केली.
