AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीलंकेच्या मार्गावर पाकिस्तान, एका डॉलरची किंमत 200 पाकिस्तानी रुपये, लक्झरी कार आणि कॉस्मेटिक आयातीवर बंदी

पाकिस्तानात सध्या डॉलरचे ब्लॅक मार्केटिंगही वाढले आहे आणि हे रोखण्यात पाकिस्तानी सरकार अपयशी ठरताना दिसते आहे. सरकारने लक्झरी आणि गरजेच्या नसलेल्या चैनीच्य व्सतुंची आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेच्या मार्गावर पाकिस्तान, एका डॉलरची किंमत 200 पाकिस्तानी रुपये, लक्झरी कार आणि कॉस्मेटिक आयातीवर बंदी
Pakistani economy crisisImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: May 19, 2022 | 9:25 PM
Share

इस्लामाबाद – पाकिस्तानची (Pakistan)अर्थव्यवस्था गतीने दिवाळखोरीच्या (economics crisis)दिशेने निघालेली आहे. डॉलरच्या (dollar)तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत २०० पर्यंत पोहचली आहे. गुरुवारी एका डॉलरच्या बदल्यात पाकिस्तानला २०० रुपये द्यावे लागतील. याबरोबरच डॉलरचे ब्लॅक मार्केटिंगही वाढले आहे आणि हे रोखण्यात पाकिस्तानी सरकार अपयशी ठरताना दिसते आहे. सरकारने लक्झरी आणि गरजेच्या नसलेल्या चैनीच्य व्सतुंची आयात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉलर पाकिस्तानी २०० रुपयांपर्यंत

फॉरेक्स असेसिएशन ऑफ पाकिस्तान आणि बिझनेस रेकॉर्डर पाकस्तानने बुधवारी रात्री जाहीर केलेल्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत १९९ रुपयांपर्यंत पोहचला होता. गुरुवारी तो अधिक पडेल अशी शक्यता आहे. ११ एप्रिल रोजी जेव्हा शहाबाज शरीफ यांचे आघाडीचे सरकार सत्तेत आले होते तेव्हा डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया १८२वर होता. इम्रान सरकारने परदेशी कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत आणि नव्या सरकारला हे हप्ते भरणे सध्यातरी अवघड दिसते आहे. दुसरीकडे देशात श्रीनंत लोकांकडे मोठ्या प्रमाणात डॉलर्स आहेत, त्यामुळे ब्लॅक मार्केटिंग सुरु झाले आहे. एका डॉलरच्या बदल्यात ब्लॅक मार्केटिंगमध्ये २६० पाकिस्तानी रुपये द्यावे लागत आहेत.

लक्झरी कार आणि कॉस्मेटिक्स आयातीवर बंदी

अर्थव्यवस्था गर्भगळीत होत असल्याचे पाहून सरकारला जाग आली आहे. बुधवारी दुपारी शाहबाज शरीफ यांनी आपत्कालीन बैठक बोलावली. यात अर्थमंत्री आणि अर्थ खात्याचे अधिकारी, अर्थतज्ज्ञ उपस्थित होते. मिटिंग नंतर एक पत्रक काढण्यात आले, त्यात लक्झरी कार, चैनीच्या वस्तू याच्यासह कॉस्मेटिक्सच्या आयातीवर तातडीने बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय़ घेण्यात आलाय, त्याची यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पाकिस्तनातील श्रीमंत वर्ग मोठ्या प्रमाणातून बाहेरच्या देशांतकून कार आयात करतात. त्याचबरोबर कॉस्मेटिक्स क्रीम आणि परफ्युम्समही आयात करण्यात येतात.

आता आयएमएफच्या मदतीकडे लक्ष

पाकिस्तानचा १९ वा आयएमएफ कार्यक्रम इम्रान सरकार पडण्यापूर्वीच अडकले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानातील अर्थव्यवस्था सुधारा, असा सल्ला पाकिस्तानला दिला होता. असे झाले नाही तर सर्व सबसिडी बंद करण्यात येईल असेही सांगण्यात आले होते. यासाठी इंधनांच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजाराच्या किमतीप्रमाणे आणा आणि वीज महाग करा असे सांगण्यात आले होते.

इम्रान सरकारने हे ऐकले नाही. सरकार पडेल या चिंतेने त्यांनी इँधन १० रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय़ घेतला. त्यामुळे आयएमएफने निधी देण्यास नकार दिला. आता शहबाज शरीफ पुन्हा एकदा आय़एमएसमोर मदतीसाठी हात पसरत आहेत. पण सध्याची अस्थिर राजकीय स्थिती पाहता आयएमएफ काही मदत करेल, अशी आशा नसल्याचे सांगण्यात येते आहे. परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो सध्या अमेरिकेत आले आहेत. जर अमेरिकन सरकारने यात हस्तक्षेप केला तर काही अटींवर पाकिस्तानला काही निधी मिळण्याची शक्यता आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.