Kulbhushan Jadhav: अखेर, कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार मिळाला, पाकिस्तानच्या संसदेत विधेयक मंजूर

| Updated on: Nov 17, 2021 | 6:08 PM

पाकिस्तानने बुधवारी संसदेच्या संयुक्त बैठकीदरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (ICJ) निर्णयानुसार कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार देणारे विधेयक मंजूर केले.

Kulbhushan Jadhav: अखेर, कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार मिळाला, पाकिस्तानच्या संसदेत विधेयक मंजूर
kulbhushan jadhav
Follow us on

अखेर, कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार मिळाला आहे. पाकिस्तानने बुधवारी संसदेच्या संयुक्त बैठकीदरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या (ICJ) निर्णयानुसार कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार देणारे विधेयक मंजूर केले.

गेल्या महिन्यात, पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयाने भारताला फाशीची शिक्षा भोगत असलेले कैदी कुलभूषण जाधव यांची बाजू मांडण्यासाठी आणि लष्करी कोर्टाने ठोठावलेल्या शिक्षेचा आढावा घेण्यासाठी, वकिलाची नियुक्ती करायला अधिक वेळ दिला होता.

भारताच्या दबावापुढे पाकिस्तान झुकला

51 वर्षीय निवृत्त भारतीय नौदल अधिकारी, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. जाधव यांना कॉन्सुलर अॅक्सेस नाकारल्याबद्दल आणि फाशीच्या शिक्षेच्या विरोधात, भारताने पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) धाव घेतली होती.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर, ICJ ने जुलै 2019 मध्ये एक निर्णय जारी केला, ज्यामध्ये पाकिस्तानला जाधव यांना भारताचा कॉन्सुलर अॅक्सेस देण्यास सांगितले आणि त्यांच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा हे देखील सुनिश्चित केले. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या (IHC) मुख्य न्यायमूर्ती अतहर मिनाल्लाह, न्यायमूर्ती आमेर फारूक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याबाबत कायदा मंत्रालयाच्या खटल्याची सुनावणी केली.

इतर बातम्या-

मी त्या देशातून येतो, जिथं दिवसा बायकांची पूजा केली जाते आणि रात्री रेप, वीर दासचा व्हिडीओ भडकाऊ की वास्तव?

Waqf Board land scam case: पुण्याचे उपजिल्हाधिकारी अजय पवार ED समोर हजर