Waqf Board land scam case: पुण्याचे उपजिल्हाधिकारी अजय पवार ED समोर हजर

गेल्या आठवड्यात ED ने सात ठीकाणी एका व्यक्तीच्या मालमत्तांवर छापे टाकले होते, ज्याने महाराष्ट्राच्या वक्फ बोर्ड विभागाची फसवणूक केली. ट्रस्टच्या जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्याआधी कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती.

Waqf Board land scam case: पुण्याचे उपजिल्हाधिकारी अजय पवार ED समोर हजर
Waqf Board case Pune
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Devashri Bhujbal

Nov 17, 2021 | 4:40 PM

वक्फ बोर्ड मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात राज्य सरकारकडून जमिनीच्या मोबदल्याच्या फसव्या दाव्याशी संबंधित, आज पुण्याचे उपजिल्हाधिकारी अजय पवार अंमलबजावणी संचालनालयासमोर (ED) हजर झाले. गेल्या आठवड्यात ED ने सात ठीकाणी एका व्यक्तीच्या मालमत्तांवर छापे टाकले होते, ज्याने महाराष्ट्राच्या वक्फ बोर्ड विभागाची फसवणूक केली. ट्रस्टच्या जमिनीच्या बदल्यात मोबदला देण्याआधी कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती.

काय आहे हे प्रकरण

वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याने पुणे शहर पोलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पुण्यातील मुळशी परिसरातील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हक्क सांगण्यासाठी शहरातील दोन लोकांनी बनावट ट्रस्ट तयार केला होता. 13 ऑगस्ट 2021 रोजी पुणे शहरातील बंड गार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बनावट ट्रस्ट तयार करून आरोपींनी जमिनीच्या मालकीचा दावा केला आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात बनावट कागदपत्रे सादर केली. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्यांच्या खात्यात 8.76 कोटी रुपये जमा केले गेले.

यापूर्वी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती, त्यापैकी तीन जामिनावर बाहेर आहेत, तर दोन अजूनही कोठडीत आहेत. आरोपींपैकी झरीफ खान, ज्याची ओळख तपासादरम्यान उघड झाली, तो सुरुवातीपासूनच फरार आहे आणि ED ने त्याच्या ठिकाणांवरच छापे टाकले होते.

इतर बातम्या

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी? डॉ. विशाखा शिंदे यांना वाढतं समर्थन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

MPSC News : दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची अंतिम उत्तर तालिका जाहीर, आता निकालाची प्रतीक्षा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें