अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी? डॉ. विशाखा शिंदे यांना वाढतं समर्थन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांच्या संघटनाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स ही महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची सगळ्यात मोठी संघटना आहे. ती संघटनाही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आलाय.

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चोर सोडून संन्याशाला फाशी? डॉ. विशाखा शिंदे यांना वाढतं समर्थन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणी डॉ. विशाखा शिंदे यांच्यावरील निलंबन कारवाईला विरोध


अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला होता. रुग्णालय आग प्रकरणात डॉ. विशाखा शिंदे यांना निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणात सध्या त्या अटकेत आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. विशाखा शिंदे यांच्या समर्थनात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये विशाखा शिंदे या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे डॉक्टरांच्या संघटनाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आलाय. तर महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स ही महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची सगळ्यात मोठी संघटना आहे. ती संघटनाही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पोस्टमध्ये करण्यात आलाय. दरम्यान, पुरेसे पुरावे असल्यानेच ही कारवाई करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केलाय. (Post on social media that suspension action against trainee doctor Visakha Shinde is wrong)

नेमकं प्रकरण काय?

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात 6 नोव्हेंबर रोजी आग लागी लागली होती. या आगीत रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांसह एक वैद्यकीय अधिकारी, तीन नर्स आणि एक वॉर्डबॉय यांचं निलंबन करण्यात आलं होतं. यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्याअधिकारी आणि नर्स यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनाला शहरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. विशाखा शिंदे या विद्यार्थीनी असून त्या कर्मचारी नव्हत्या, असं परिचारिकांनी म्हटलंय. त्यांचं निलंबन चुकीच्या पद्धतीने झाल्याचं लक्षात आल्यानंतर प्रशासनाकडून त्यांचं निलंबन वापस घेतल्याचा बनाव करण्यात आला, असं परिचारिका संघटनेनं म्हटलंय. त्यामुळे शिंदे यांचं निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे.

सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट

>> त्यांचा गुन्हा काय?

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्या वर दाखल झाला आहे.

>> कोण आहेत डॉ. विशाखा शिंदे?

डॉ. विशाखा ह्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अस्थीरोग (Orthopedics) विभागात पदव्युत्तर पदवीका (Post-graduate diploma) करणाऱ्या शिकाऊ डॉक्टर आहेत. थोडक्यात काय तर त्या अस्थीरोग विभागात शिकणाऱ्या विद्यार्थीनी आहेत.

>> “त्या” दिवशी नेमके काय झाले?

कोविड रुग्णांवर उपचार चालू असणाऱ्या ICU विभागात काही कारणांमुळे आग लागली. त्या कारणाचा शोध पोलीस व शासनाच्या इतर यंत्रणा करत आहेत. या आगीत होरपळून काही रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला. डॉ. विशाखा ह्या त्या दिवशी या विभागात ड्युटी वर होत्या.

>> मग आता नेमकी अडचण काय?

या प्रकरणी कारवाई म्हणून त्या दिवशी ड्युटी वर असणाऱ्या काही परिचारिका आणि डॉ. विशाखा ह्यांना या प्रकरणी दोषी ठरवले गेले. आरोग्य विभागाने यांना निलंबित केले तर पोलीस विभागाने यांच्यावर गुन्हा दाखल करून यांना अटक केली.

निलंबित केल्याच्या तिसऱ्या दिवशी आरोग्य विभागाला आपली चूक लक्षात आली. डॉ. विशाखा ह्या शिकाऊ डॉक्टर असल्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. परंतु पोलिस विभागाने मात्र त्यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आणि डॉ. विशाखा यांच्या अडचणीत वाढ झाली. त्या आजतागायत कोठडी मध्ये आहेत आणि प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.

>> आपल्या कडून काय अपेक्षा?

डॉ. विशाखा ह्या एक MBBS डॉक्टर आहेत. त्या एक डॉक्टर आहेत या नात्याने तरी या संघटनांनी त्यांना पाठिंबा देत मदत करायला हवी होती. पण ती मदत होताना दिसत नाही.

डॉक्टर रुग्ण तपासणी करेल की वार्डमधील वायरी तपासेल?

डॉ. विशाखा ह्या एका सरकारी रुग्णालयात आपली जबाबदारी बजावत होत्या. त्या तिथे एक शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करत होत्या. रुग्णालय प्रशासन आणि नियोजन यांच्याशी त्यांचा काही एक संबंध नव्हता. त्यामुळे जर काही तांत्रिक कारणांमुळे आग लागली असेल तर डॉ. विशाखा ह्यांना त्या प्रकरणी दोषी ठरवणे सर्वस्वी चुकीचे आहे. रुग्णालयातील आग रोधक यंत्रणा आणि त्याची तपासणी ( fire safety audit) यांच्याशी त्यांचा काही एक संबंध नाही. तरीही त्यांना या प्रकरणी गोवण्यात येत आहे. डॉ. विशाखा ह्यांचा बळी देऊन खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घळण्याची ही खेळी आहे. ड्युटीवर असणारा डॉक्टर रुग्ण तपासणी करेल की वार्डमधील वायरी आणि इलेक्ट्रॉनिक वास्तू तपासेल?

पदव्युत्तर शिक्षण घेऊन समाजात नावारुपाला येण्याच्या डॉ. विशाखा ह्यांच्या स्वप्नाला ह्यामुळे सुरुंग लागला आहे. आज डॉ. विशाखा आहेत, उद्या दुसरे कोणी असू शकेल. त्यामुळे ह्या विरोधात बोलले गेलेच पाहिजे. म्हणून डॉ. विशाखा ह्यांना त्यांच्या प्रोफेशन मधील माणसांची गरज आहे. आपल्या वैयक्तिक पातळीवर तसेच आपण ज्या कुठल्या संघटनेत असाल त्या संघटनेच्या पातळीवर डॉ. विशाखा ह्यांना समर्थन आपण कराल आणि एका डॉक्टरच आयुष्य उध्वस्त होण्यापासून त्यांना वाचवाल, असं आवाहन या पोस्टद्वारे करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

भाजपच्या नामनिर्देशित सदस्याला स्थायी समितीतून हटवण्यासाठी 1 कोटीची उधळपट्टी; बीएमसीचा अजब कारभार चव्हाट्यावर

MHT CET: सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ, नेमकं कारण काय?

Post on social media that suspension action against trainee doctor Visakha Shinde is wrong

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI