MHT CET: सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ, नेमकं कारण काय?

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन प्रवेश नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे.

MHT CET: सीईटी कक्षाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ, नेमकं कारण काय?
MHT CET 2021
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 3:52 PM

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. विविध अभ्यासक्रमांच्या नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीदरम्यान अमरावती जिल्हयामध्ये संचारबंदी व इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे उमेदवारांना अर्ज करताना अडचणी निर्माण झालेल्या होत्या. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करता पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी दिली आहे.

या अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ

एम.आर्च, एमसीए, एम.फार्मसी, एम.ई. एम.टेक, बी. आर्च, डीएसई, डीएसपी, बी.एचएमसीटी, बी.ई. बी.टेक, बी.फार्मसी, एमबीए, एमएमएस या अभ्यासक्रमांच्या नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे.

Mahacet Cap

महासीईटी कक्षाकडून प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट देणयाचं आवाहन

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रविंद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन प्रवेश नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी महा सीईटी सेलच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमांसाठी कॅप प्रक्रिया सुरु

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने आर्किटेक्चर विभागातील खालील व्यावसायिक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (कॅप) राबविण्यात येत आहे. मास्टर ऑफ आर्किटेक्चर आणि बॅचलर्स ऑफ आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

फार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं समुपदेशनाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बी. फार्म आणि डी. फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया 12 नोव्हेंबर 2021 ते 23 नोव्हेंबर 2021 दरम्यान सुरु राहील.

इतर बातम्या:

Maharashtra School Reopen: कोरोना रुग्ण घटले, दिवाळी संपली, पहिली ते चौथीचे वर्ग सुरु होण्याची शक्यता

‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय यांचा स्मृतिदिन, जहाल नेते म्हणून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बजावलेली भूमिका

MHT CET 2021 Cet cell extended Registration dates due to internet down in Amravati

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.